शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

उच्च शिक्षित तरुणाने देशी गायींच्या गोठ्यातून साधली आर्थिक उन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 12:30 IST

यशकथा :  या गोठ्यात फक्त त्याने देशी गायींचा समावेश केला. 

- हेमंत आवारी (अहमदनगर) 

भारतात पूर्वी ४९ देशी गोवंश जाती होत्या. पैकी सध्या ४० जाती अस्तित्वात आहेत. यातील गीर, काँक्रेज, खिलारी अशा ६४ देशी गावरान गायींचा मुक्त गोठा अकोले तालुक्यातील कोकणेवाडी-धांदरफळ शिवारात एका उच्चशिक्षित तरुणाने तयार केला आहे. यात ८० रुपये लिटर दूध, तीन हजार रुपये किलो गावरान तूप अन् ३० रुपये लिटर ब्रह्ममुहूर्तावर धरलेल्या गोमूत्रातून त्यास चांगला आर्थिक उन्नतीचा मार्ग सापडला आहे. 

अकोले-संगमनेर रस्त्यालगत कोकणेवाडी-धांदरफळ शिवारातील शुभम् भास्कर घुले हा तरुण पुण्याच्या ‘फर्ग्युसन’ महाविद्यालयातून पदवी घेऊन बाहेर पडला. पारंपरिक शेतीला पूरक जोडधंदा गोपालन करण्यासाठी त्याने राज्यातील व गुजरातमधील देशी गायीचे गोठे अभ्यासले. वडिलांच्या मार्गदर्शनाने चुलते सुदाम यांच्या सोबतीने पूर्वीच्या १९ जर्सी गायींच्या गोठ्याच्या आर्थिक कुबड्यांवर त्याने ‘निमाई’ नावाचा गोठा तयार केला. या गोठ्यात फक्त त्याने देशी गायींचा समावेश केला. 

जर्सी गायीच्या दुधात ‘हिस्टाडींन’असते, ते मानवी शरीरावर विपरीत परिणाम करू शकते.  तर गावरान देशी गायीच्या दुधात ‘प्रोलिटिंग’असते ते आरोग्यवर्धक असते. याचा अभ्यास करून त्याने साधारण ८० हजार ते १ लाख ३० हजार रुपयांना एक गाय अशा ६४ गायी गुजरात राज्यातून आणल्या आहेत. ३ लाख रुपये किमतीचा ‘वळू’देखील गोठ्यात आहे. चारा काढणे, चारा घालणे, शेण काढणे, गायींची धार काढणे, गोमूत्र धरणे ही सर्व कामे हातानेच केली जातात. यंत्राने दूध काढले जात नाही. 

शुभमने सुरू केलेल्या या गोठ्यामुळे घरातील माणसांसह आजूबाजूच्या २०-२५ लोकांना त्यामुळे रोजगार मिळाला आहे. गायींच्या कासाच्या आजाराचा प्रश्न असतो. त्यासाठी आयुर्वेदिक उपचार केले जातात. मका, गुजरातमधून आणलेला सुका चारा, शतावरी, अश्वगंधा, ब्राह्मणी, कडुलिंब व शेवग्याचा पाला, कॅल्शियम वाढीसाठी चुना, असा पोषक चारा गायींना दिला जातो. संस्कृत स्रोत संगीत ऐकवले जाते. यातून गोठ्याची शुद्धता व गोठ्याचे पावित्र्य जपले जाते.

एक गाय साधारण दहा लिटर दूध दोन वेळेला देते. ४.६ ते ५.०  दुधाला फॅट मिळते. सध्या १७५ लिटर दूध उत्पादित होत असून, ५० लिटर दूध संगमनेर शहरात विकले जाते. इतर दुधाचे पारंपरिक पद्धतीने तूप बनवले जात आहे. साधारण एक लिटर दूध निर्मितीला ५९ रुपये खर्च येतो. सध्या ८० रुपये लिटर दूध, ३ हजार रुपये किलो तूप, ३० रुपये लिटर गोमूत्र, ३ हजार रुपये टन शेण विकले जाते. 

१३ ते १४  वेतानंतर गाय भाकड होते. या गायींच्या सहवासात अर्धा तास राहिले तरी उच्च रक्तदाब नियंत्रित होतो. शुद्धता पाळली, तर हा व्यवसाय कधीच तोट्यात जाणार नाही. तूप महाग असले तरी ग्राहकांना तुपासाठी प्रतीक्षा करावी लागते. एखाद्याची आर्थिक परिस्थिती नसली आणि औषधासाठी तूप हवे असल्यास त्याला पैशांची सक्ती केली जात नाही, असे शुभम घुले यांनी सांगितले.