शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

रेशन घोटाळा अहवालाची लपवाछपवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 16:37 IST

पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे झालेल्या स्वस्त धान्य घोटाळ्याचा तपासणी अहवाल गेल्या सात महिन्यांपासून प्रलंबित आहे.

अहमदनगर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे झालेल्या स्वस्त धान्य घोटाळ्याचा तपासणी अहवाल गेल्या सात महिन्यांपासून प्रलंबित आहे. तपासणी पूर्ण झाल्याचा दावा पारनेर तहसील कार्यालयाकडून केला जातो, परंतु अहवाल मात्र पुरवठा विभागाकडे आलेला नाही. पुरवठा विभागानेही या अहवालाच्या विलंबाबाबत विचारपूस केलेली नाही. त्यामुळे तहसील, तसेच पुरवठा विभागाच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित होत आहेत.नोव्हेंबर २०१७ मध्ये टाकळी ढोकेश्वर येथे स्वस्त धान्य दुकानात विक्रीसाठी आलेले धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात आले. या प्रकारात तथ्य आढळल्याने पुरवठा विभागाने धान्य दुकानाचा परवाना निलंबित केला. हे दुकान गावच्या सोसायटीकडे चालवण्यास होते. त्याअंतर्गत टाकळी ढोकेश्वर व कासारे या दोन गावांतील सुमारे दीड हजार लाभार्थ्यांना धान्यपुरवठा होत होता. पुरवठा विभागाने पारनेर तहसील कार्यालयाला सूचना देऊन या घोटाळ्याची चौकशी सुरू केली. नायब तहसीलदार, पुरवठा निरीक्षक, मंडलाधिकारी, तलाठी यांनी या चौकशीअंतर्गत शंभर टक्के कार्ड तपासणी सुरू केली. परंतू गेल्या सात महिन्यांपासून ही तपासणीच पूर्ण होईना. याबाबत पारनेर तहसील कार्यालयात ‘लोकमत’ने मागील महिन्यात विचारणा केली असता, त्यांनी तपासणी पूर्ण झाली असून एक-दोन दिवसांत पुरवठा विभागाकडे अहवाल पाठवण्यात येईल, असे सांगितले. परंतु अद्याप हा अहवाल पुरवठा विभागाकडे गेलेला नाही.जिल्ह्यात रेशन घोटाळ्याची शक्यता?रेशनकार्डमध्येही जिल्ह्यात मोठा घोटाळा असण्याची शक्यता आहे. टाकळी ढोकेश्वर येथे धान्य घोटाळा होऊनही तहसीलदारांकडून याची चौकशी पूर्ण होत नाही. तहसीलदारांकडून ही यंत्रणा दडपली जातेय का, असा प्रश्न उपस्थित झाला असून दुसरीकडे पुरवठा विभागही यात लक्ष घालायला तयार नाही. पुरवठा विभागाचा आदेशच तहसीलदारांकडून धाब्यावर बसवला गेला आहे. एका दुकानाच्या तपासणीसाठी जर सात महिने लागत असतील, तर यात काहीतरी काळंबेरं असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.नायब तहसीलदार, पुरवठा निरीक्षक, मंडलाधिकारी, तलाठी यांच्या पथकामार्फत टाकळी ढोकेश्वर येथील धान्य घोटाळ्याची कार्ड तपासणी केलेली आहे. परंतु या पथकाने तहसीलकडे अहवाल दिला की नाही याची विचारणा करते. पुरवठा विभागाकडे हा अहवाल गेलेला नसेल तर तातडीने पाठवला जाईल.- भारती सागरे, तहसीलदार, पारनेरटाकळी ढोकेश्वर येथील धान्य घोटाळ्याबाबत शंभर टक्के कार्ड तपासणी करण्याचे आदेश तहसील कार्यालयाला दिले होते. परंतु अद्याप त्यांचा अहवाल मिळालेला नाही. याबाबत चौकशी करून विलंबाबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल.- जितेंद्र इंगळे, सहायक पुरवठा अधिकारी 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेर