शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

इथे सरकारी अधिकारीच देतात गर्भवतींना सिझेरियनचा सल्ला; घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयावर संतप्त महिलांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 15:52 IST

बाळ मृत झाले आहे, खासगी रुग्णालयात जाऊन सिझेरीयन करावे लागेल, असे सांगत चक्क वैद्यकीय अधिकारीच गरोदर महिलांना खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देत आहेत, असा आरोप करीत शुक्रवारी संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील ग्रामीण रूग्णालयावर संतप्त महिलांनी मोर्चा काढला.

ठळक मुद्देग्रामीण रूग्णालयात बाळंतपणासाठी आलेल्या अनेक महिलांना बाळ पोटातच मृत झाल्याचे सांगितले जाते.अनेक गर्भवती महिलांना सुलभ बाळंतपण होणार नसुन खासगी रूग्णालयात सिझेरीयन करण्याचा सल्ला येथे दिला जातो. संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी रूग्णालयावर मोर्चा नेत रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजीव घोडके यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचला.रूग्णालयातील डॉक्टर व परिचारीका आपली जबाबदारी झटकत असून उपचारास अनेकदा टाळाटाळ होते. वैद्यकिय अधिका-यांचे रूग्णालयावर नियंत्रण राहिले नसल्याने असे प्रकार होत आहेत.

संगमनेर : बाळ मृत झाले आहे, खासगी रुग्णालयात जाऊन सिझेरीयन करावे लागेल, असे सांगत चक्क वैद्यकीय अधिकारीच गरोदर महिलांना खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देत आहेत, असा आरोप करीत शुक्रवारी संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील ग्रामीण रूग्णालयावर संतप्त महिलांनी मोर्चा काढला.संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी रूग्णालयावर मोर्चा नेत रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजीव घोडके यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचला. रूग्णालयाच्या कामकाजाबाबत सुधारणा न झाल्यास रास्ता रोको व उपोषण करण्याचा इशारा महिलांनी दिला.ग्रामीण रूग्णालयात बाळंतपणासाठी आलेल्या अनेक महिलांना बाळ पोटातच मृत झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर खासगी रूग्णालयात या महिलांचे बाळंतपण झाल्यानंतर बाळ सुखरूप असते. अनेक गर्भवती महिलांना सुलभ बाळंतपण होणार नसुन खासगी रूग्णालयात सिझेरीयन करण्याचा सल्ला येथे दिला जातो. मात्र, त्यानंतर खासगी रूग्णालयात त्या महिलांचे सुलभ बाळंतपण केले जाते. अशा अनेक धक्कादायक गोष्टी उपस्थित महिलांनी आंदोलनादरम्यान सांगितल्या.तालुक्यातील गोरगरिब नागरिक या रूग्णालयात उपाचारांसाठी येतात. मात्र, रूग्णांना उपचारापूर्वीच गंभीर असल्याचे भासवत बाहेरचा रस्ता दाखवण्यात येतो. रूग्णालयातील डॉक्टर व परिचारीका आपली जबाबदारी झटकत असून उपचारास अनेकदा टाळाटाळ होते. वैद्यकिय अधिका-यांचे रूग्णालयावर नियंत्रण राहिले नसल्याने असे प्रकार होत आहेत. दररोज रूग्ण व तेथील कर्मचा-यांमध्ये वादवादीचे प्रकार घडू लागले आहेत, असे आरोप आंदोलक महिलांनी केले. मोर्चात निर्मला गुंजाळ, जिल्हा परिषद सदस्य सिताराम राऊत, नंदा बागुल, पंचायत समिती सदस्या सुनंदा जोर्वेकर, सुनिता कांदळकर, सुनिता अभंग सहभागी झाल्या.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर