शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Ahmednagar: यापुढे बैलांची वेदनारहित नसबंदी, पशुसंवर्धन विभागात अंमलबजावणी

By चंद्रकांत शेळके | Updated: June 19, 2023 16:44 IST

Ahmednagar:

- चंद्रकांत शेळके अहमदनगर : पारंपरिक पद्धतीने बैलांना वेदना देत त्यांची नसबंदी (खच्चीकरण) करण्याची पद्धत बंद करून बैलांना भूल देऊन त्यांची वेदनारहित नसबंदी करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने सुरुवात केली आहे. यासाठी ॲनिमल राहत संघटनेने पुढाकार घेतला असून, राज्यभर हा प्रयोग केला जात आहे. नगरमध्येही नुकतीच याबद्दल कार्यशाळा होऊन पशुवैद्यकांना याबाबत माहिती देण्यात आली.

गायींची लागवड पारंपरिक पद्धतीने बैलाद्वारे करण्याऐवजी कृत्रिम रेतनाला पशुसंवर्धन विभागाकडून प्रोत्साहन दिले जात आहे. कारण, या प्रक्रियेतून पाहिजे तशी जातिवंत पैदास करता येते. त्यामुळे बैलांच्या नसबंदीसाठी (खच्चीकरण) पशुसंवर्धन विभागाकडून वेळोवेळी शेतकऱ्यांचे प्रबोधन केले जाते. मात्र, आतापर्यंत पशुपालकांकडून पारंपरिक अमानवी पद्धतीने आणि पशुवैद्यकाशिवाय नसबंदी केली जात होती. बैलांना जबरदस्तीने जमिनीवर पाडून चिमट्याच्या साहाय्याने अंडाशयातील शुक्रवाहिनी बंद केली जायची. यातून अनेक दुष्परिणाम समोर येऊ लागले. प्रामुख्याने बैलाला प्रचंड वेदना होत असे. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या ॲनिमल राहत संघटनेने नसबंदीसाठी भुलीचा पर्याय समोर आणला. त्याबाबत पशुसंवर्धन विभागाशी चर्चा करून आता हा आदेशच निघाला आहे.

दरम्यान, ही मोहीम पुढे नेण्यासाठी ॲनिमल राहत संस्था आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यामाने जिल्हानिहाय कार्यशाळा होत आहेत. नगरमध्येही नुकतीच अशी कार्यशाळा झाली. त्यात जिल्ह्यातील सरकारी पशुवैद्यकांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाला पशुसंवर्धनचे उपआयुक्त डॉ. सुनील तुंबारे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मुकुंद राजळे, पशुधन विकास अधिकारी डॉ. अशोक ठवाळ यांच्यासह जिल्ह्यातील ८५ पशुधन विकास अधिकारी उपस्थित होते.

गेल्या वर्षी २८ हजार बैलांची नसबंदीनगर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात २८ हजार बैलांची नसबंदी करण्यात आली. परंतु, ती पारंपरिक पद्धतीने झाली असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या वतीने देण्यात आली. परंतु, यापुढे आता भूल देऊनच बैलांची नसबंदी केली जाणार आहे. शासकीय तसेच खासगी पशुवैद्यकांनाही तशा सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर