जवळे : तिळवण तेली समाज बांधवांनी एकत्र येऊन राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील कोरोनाने जीव गमवावा लागलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना ५३ हजार ४०० रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिली.
सोमनाथ भीमराज सोनवणे (वय ४०, रा.लोणी, ता.राहाता) या तरुणाचा कोरोनाने नुकताच मृत्यू झाला. त्याच्यामागे वृद्ध आई, वडील, पत्नी, लहान मुले असा परिवार आहे. सामाजिक बांधिलकीतून तिळवण तेली समाज बांधवांनी एकत्र येऊन, त्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी मदत एकत्र केली. प्रत्येकाने खारीचा वाटा उचलून त्या कुटुंबाला ५३ हजार ४०० रुपयांची मदत जमा करून दिली. सोमनाथ सोनवणे यांच्या पत्नी रेणुका सोनवणे यांच्याकडे ठेव पावती स्वरूपात केलेली मदत देण्यात आली.
यावेळी लोणी बुद्रुकचे ग्रामपंचायत सदस्य गोरख दिवटे, शिवाजी दिवटे, अखिल भारतीय ओबीसी जिल्हा संघटना अध्यक्ष भरत दिवटे, किसन सोनवणे, भास्कर सोनवणे, ओंकार दिवटे, सोमनाथ बनसोडे, सुधाकर बनसोडे, अविनाश निकम, दिलीप शिंदे, दादासाहेब दिवटे, कारभारी व्यवहारे, आदित्य बागले, नंदू दिवटे, संतोष दिवटे आदी उपस्थित होते.
---
१९ लोणी मदत
भरत दिवटे यांच्या हस्ते ठेव पावतीसाठीचा धनादेश रेणुका सोनवणे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला.