पाथर्डी : कोरोना लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अभय आव्हाड प्रतिष्ठानकडून वृत्तपत्र वितरकांना एक महिना पुरेल इतका किराणा भेट देण्यात आला.
वृत्तपत्र विक्रेते हे ऊन, वारा, पाऊस यापैकी कशाचीही तमा न बाळगता दररोज सकाळी वृत्तपत्र वितरणाची सेवा देत असतात. कोरोनाकाळातही आरोग्याची तमा न बाळगता त्यांनी हे काम सुरू ठेवले आहे. अशा कामगारांना आपल्या परीने छोटासा मदतीचा हात म्हणून येथील अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठानने एक महिना पुरेल इतका किराणा किट देऊन सन्मान केला. यावेळी अभय आव्हाड, बबन सबलस, दत्ता सोनटक्के, संदीप आव्हाड, बाबासाहेब मोरे पाटील, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. बबन चौरे आदी उपस्थित होते.
---
०३ आव्हाड मदत
020621\41041327-img-20210602-wa0021.jpg
कोरोना किट वाटपप्रसंगी अभय आव्हाड, बबन सबलस, दत्ताशेठ सोनटक्के, संदीप आव्हाड, बाबासाहेब मोरे पाटील, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. बबन चौरे आदी उपस्थित होते.