शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

नीलेश लंके यांच्या कोविड सेंटरला देश-विदेशातून मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:22 IST

पारनेर : कोरोनाच्या महामारीत वर्षभराहून अधिक काळ रुग्णांची सेवा करणाऱ्या आमदार नीलेश लंके यांच्या सेवाभावावर देश-विदेशातील नागरिकांनीही विश्वास ठेवला ...

पारनेर : कोरोनाच्या महामारीत वर्षभराहून अधिक काळ रुग्णांची सेवा करणाऱ्या आमदार नीलेश लंके यांच्या सेवाभावावर देश-विदेशातील नागरिकांनीही विश्वास ठेवला आहे. त्यांनी भाळवणी येथे सुरू केलेल्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरासाठी (कोविड सेंटर) देश-विदेशातून तब्बल सव्वाकोटीची रोख मदत जमा झाली. मावळातील (जि. पुणे) नागरिकांनी तांदुळ, तर कोकणवासीयांनी रुग्णांसाठी हापूस आंबे पाठविले आहेत.

१४ एप्रिल रोजी लंके यांनी भाळवणी येथील नागेेश्‍वर मंगल कार्यालयात १ हजार १०० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केले. त्याचदिवशी लंके समर्थकांसाठी शासकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी वीस लाख रुपयांची मदत घोषित केली. दुसऱ्या दिवसापासून तालुक्यासह तालुक्याबाहेरूनही मदतीचा ओघ सुरू झाला. कोणी भाजीपाला, कोणी फळे, तर कोणी धान्याची पोती भाळवणी येथील आरोग्य मंदिरात आणून टाकली. रुग्णांसाठी अंडी, सुकामेवा आदी देणाऱ्यांचीही रिघ लागू लागली. धान्याची तर रास लागल्याने, आता धान्य पाठवू नका, इतर आवश्यक मदत पाठवा, असे सांगण्याची वेळ आली. प्रशासनाकडून रुग्णांसाठी औषधे देण्यात येत आहेत. मात्र पुरवठा अपुरा होत असल्याचे लक्षात आल्यानंतर लाखो रुपयांची औषधेही येत आहेत.

---

अनेक देशांमधूनही मदत

येथील कोविड सेंटरला पॅरिस, दुबई, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, पोलंड, कॅनडा आदी देशांमधून नीलेश लंके प्रतिष्ठानच्या खात्यावर रक्कम जमा होऊ लागली आहे. देश-विदेशातील मदतीचा ओघ दिवसेंंदिवस वाढतच असून राज्याच्या जवळपास सर्वच जिल्ह्यांमधून मदत जमा होत आहे.

---

कोकणवासीयांनाही भुरळ..

आ. लंके यांचा करिष्मा दूरचित्रवाहिनी तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिल्यानंतर कोकणातील तरुणांनी थेट आ. लंके यांच्याशी संपर्क साधून रुग्णांसाठी खास हापूस आंबे तसेच कोकणी तांदुळ पाठवित असल्याचे सांगितले. ते भाळवणीच्या आरोग्य मंदिरात पोहोचदेखील केले.

--

चिमुरडे, अंगणवाडी सेविकांचीही मदत...

या कोविड सेंटरला मतदारसंघातील अनेक चिमुरड्यांनीही मदत दिली. त्यांनी बचत बँकेत साठविलेले, सायकलसाठी साठविलेले पैसे सेवाभावी कार्यासाठी सुपूर्द केले. अंगणवाडी सेविका, विधवा, परित्यक्तांनीही शक्य होईल तेवढा मदतीचा हातभार लावला आहे.