अहमदनगर : अपघातांना आळा घालण्यासाठी दुचाकीस्वार व पाठीमागे बसणाऱ्यांनाही हेल्मेट घालण्याची सक्ती असली तरी नगर शहरासह जिल्ह्यात या नियमाची अद्यापपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही़ वाहतूक विभाग व उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे अंमलबजावणीची जबाबदारी आहे़ हे दोन विभाग माात्र, केवळ वसुलीपुरती कारवाई करत असल्याचे समोर आले आहे़ परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी रस्ते सुरक्षा व अपघातांना आळा घालण्यासाठी हेल्मेट न वापरणाऱ्यांना पेट्रोल पंपावरून पेट्रोल मिळणार नाही असा नियम करण्यात आला असल्याची गुरुवारी घोषणा केली़ आता या नियमाची अंमलबजावनी कधीपासून आणि सक्तीने होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे़ या नियमाबाबत नगर शहरातील पेट्रोलपंप चालकांना तरी अद्यापपर्यंत काही सूचना मिळालेल्या नाहीत़ दुचाकीस्वार व पाठीमागे बसणाऱ्यांना हेल्मेट सक्ती ही आधीपासूनच आहे़ वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी वाहतूक विभागाकडून हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याने या अंमलबजावणीत काहीच दम नाही़ तर उपप्रादेशिक परिवहन विभागाने मनुष्यबळाची अडचण सांगत याबाबत हात वर केले आहेत़ त्यामुळे नव्याने झालेल्या या नियमाची तरी अंमलबजावणी होईल का? असा प्रश्न आहे़ (प्रतिनिधी)हेल्मेट न वापरणाऱ्यांना पेट्रोल मिळणार नाही असा नियम करण्यात आला असला तरी त्यांची अंमलबजावणी कधी आणि कशी होणार याबाबत काही कळविण्यात आलेले नाही़ हेल्मेट सक्ती पूर्वीपासूनच असल्याने आरटीओ विभागाच्यावतीने कारवाई करण्यात येते़ आता पंपावरच हेल्मेट न घालणाऱ्यांना पेट्रोल मिळणार नसल्याने हेल्मेट वापराला चांगला प्रतिसाद मिळेल़ -आऱटी़ गिते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेल्मेट सक्ती असल्याने वाहतूक विभागाच्यावतीने हेल्मेट न वापरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे़ या कारवाईमध्ये सातत्य आहे़ त्यामुळे हेल्मेट वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे़ -अजित लकडे, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा हेल्मेट न घालणाऱ्यांना पेट्रोल पंपावरून पेट्रोल दिले जाणार नाही मात्र, पेट्रोलसाठी दुचाकीस्वार हाच मोठा ग्राहक असल्याने पंपचालकांकडून या नियमांची तत्परतेने अंमलबजावणी होणार का ? असा विषय आहे़ वाहतूक विभागाला निरिक्षणासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागणार आहे़
हेल्मेटसक्ती पण अंमलबजावणी नाही
By admin | Updated: July 23, 2016 00:10 IST