शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बोठेच्या अटकपूर्व जामीन अर्जावर ११ डिसेंबर रोजी सुनावणी

By | Updated: December 9, 2020 04:16 IST

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जासंदर्भात ...

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जासंदर्भात जिल्हा न्यायालयात ११ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी बोठे याने न्यायालयात ॲड. महेश तवले यांच्या माध्यमातून सोमवारी अर्ज केला होता. या अर्जावर मंगळवारी न्यायाधीश एम.आर. नातू यांच्यासमाेर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने जामीन अर्जावर सरकारी वकील व तपासी अधिकाऱ्यांचे म्हणणे मागविले आहे. म्हणणे आल्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे. जरे यांच्या हत्याकांडात बोठे याचे नाव समाेर येताच तो नगर शहरातून पसार झाला. गेल्या चार ते पाच दिवसांपासून पोलिसांची पाच पथके त्याचा शोध घेत आहेत. बोठे हॉटेल, लॉजमध्ये लपल्याची शक्यता गृहीत धरत पोलिसांनी गेल्या तीन दिवसांत शिर्डीसह नाशिक व इतर शहरांत शोध घेतला. मात्र तो पोलिसांना गुंगारा देत आहे. बोठे याला कोण मदत करू शकते याचा अंदाज घेत पोलिसांनी त्याच्या मित्र व जवळच्या व्यक्तींवरही लक्ष केंद्रित केले आहे.

--------

बोठे याची लाचलुचपतमार्फत स्वतंत्र चौकशी करा : ॲड. लगड

सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्याकडे असलेल्या ज्ञात, अज्ञात संपत्तीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत स्वतंत्र चाैकशी करावी, अशी मागणी विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड यांनी मुख्यमंत्र्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केली आहे. निवेदनात लगड यांनी म्हटले आहे की, बोठे याचे हे कृत्य पत्रकारितेच्या क्षेत्राला काळिमा फासणारे आहे. बोठे याने संपत्तीसह मिळविलेल्या डॉक्टरेट पदवीचीही चौकशी करावी, तसेच त्याची पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर झालेली नियुक्तीही रद्द करण्यात यावी, जरे यांच्या हत्याकांडात बोठे याला मदत करणारे त्याचे जवळचे मित्र यांचीही चौकशी करावी, बोठे याला अटकपूर्व जामीन मिळू नये, यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी लगड यांनी केली आहे.