शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

नगरच्या सिव्हील हॉस्पिटलमधील अस्वच्छता पाहून संतापले आरोग्य उपसंचालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 11:23 IST

सोमवारी सायंकाळी अचानक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सिव्हील हॉस्पिटलची पाहणी केली. त्यानंतर मंगळवारी सकाळी आठ वाजता औरंगाबादचे आरोग्य उपसंचालक सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल झाले.

ठळक मुद्देमंगळवारी सकाळी ८ वाजताच आरोग्य उपसंचालक विजय कंधेवाढ व आरोग्य उपसंचालक कार्यालयातील अधिकारी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल झाले.आरोग्य मंत्र्यांकडे रुग्णांनी केलेल्या तक्रारींबाबत तसेच सिव्हील हॉस्पिटलमधील सुविधांबाबत आरोग्य उपसंचालक कंधेवाढ यांनी आढावा घेतला.कंधेवाढ यांनी सिव्हील हॉस्पिटलची पाहणी केली. अंतर्गत स्वच्छता तसेच परिसर स्वच्छतेची पाहणी केली. ठिकठिकाणी असलेले कच-याचे ढीग आणि अंतर्गत अस्वच्छता पाहून कंधेवाढ चांगलेच संतापले. 

अहमदनगर : सोमवारी सायंकाळी अचानक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सिव्हील हॉस्पिटलची पाहणी केली. त्यानंतर मंगळवारी सकाळी आठ वाजता औरंगाबादचे आरोग्य उपसंचालक सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यांनी हॉस्पिटलची पाहणी केली़ सिव्हील हॉस्पिटलमधील अस्वच्छता पाहून आरोग्य उपसंचालक चांगलेच संतापले. सिव्हील हॉस्पिटलची पाहणी करुन त्यांनी अधिका-यांची झाडाझडती घेतली.

मंगळवारी सकाळी ८ वाजताच आरोग्य उपसंचालक विजय कंधेवाढ व आरोग्य उपसंचालक कार्यालयातील अधिकारी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल होताच कंधेवाढ यांनी अधिका-यांची बैठक घेतली. आरोग्य मंत्र्यांकडे रुग्णांनी केलेल्या तक्रारींबाबत तसेच सिव्हील हॉस्पिटलमधील सुविधांबाबत आरोग्य उपसंचालक कंधेवाढ यांनी आढावा घेतला. त्यानंतर कंधेवाढ यांनी सिव्हील हॉस्पिटलची पाहणी केली. अंतर्गत स्वच्छता तसेच परिसर स्वच्छतेची पाहणी केली. ठिकठिकाणी असलेले कच-याचे ढीग आणि अंतर्गत अस्वच्छता पाहून कंधेवाढ चांगलेच संतापले. त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पांडुरंग बरुटे यांना स्वच्छतेविषयी सूचना दिल्या.

या अचानक भेटीबाबत डॉ. कंधेवाड यांना विचारले असता ते म्हणाले, ही नेहमीची तपासणी आहे. तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पांडुरंग बरुटे म्हणाले, भारत स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून ही तपासणी आहे.दरम्यान सोमवारी सायंकाळी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी जिल्हा माहिती कार्यालय, सिव्हील हॉस्पिटल, पोलीस प्रशासन अशा कोणत्याच विभागाला खबर लागू न देता सिव्हील हॉस्पिटलला भेट दिली़ त्यांनी सिव्हील हॉस्पिटलमध्ये फिरुन रुग्णांशी संवाद साधला. काही रुग्णांनी त्यांच्याकडे असुविधांबाबत तक्रारीही केल्या होत्या. त्यावेळी तेथे काही नर्स व डॉक्टर उपस्थित होते. मात्र, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ पांडुरंग बरुटे हे त्यावेळी रुग्णालयात उपस्थित नव्हते. मंत्री सावंत यांनी जिल्हा रुग्णालयात राऊंड मारुन जिल्हा रुग्णालयाची माहिती घेतली. तेथील काही रुग्णांशी संवाद साधला. डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसतात, अपेक्षित सोयीसुविधाही मिळत नाहीत, वारंवार तक्रारी करुनही त्यांची दखल घेतली जात नाही, अशा तक्रारी काही रुग्णांनी केल्या. थोडा वेळ थांबून आरोग्य मंत्र्यांनी तेथून निरोप घेतला. त्याच पार्श्वभूमीवर मंगळवारी आरोग्य उपसंचालकांनी जिल्हा रुग्णालयाची पाहणी केल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरHealthआरोग्य