शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दर महिन्याला आरोग्य शिबिर

By admin | Updated: August 9, 2014 00:22 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य यंत्रणेच्या कामकाजाचे वास्तववादी चित्र ‘लोकमत’ने शुक्रवारी जिल्ह्याच्या समोर आणले.

अहमदनगर : जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य यंत्रणेच्या कामकाजाचे वास्तववादी चित्र ‘लोकमत’ने शुक्रवारी जिल्ह्याच्या समोर आणले. या यंत्रणेतील दोष, त्रुटी आणि चुकीच्या कामकाजाचा लेखाजोखा वाचून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग आणि राज्य सरकारच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनीही हे प्रकरण गंभीरपणे घेत प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि अधिकारी यांचा थेट जनतेशी संबंध यावा, यासाठी दर महिन्याला संबंधित आरोग्य केंद्राच्या हद्दीतील गावात सक्तीने आरोग्य शिबिर घेण्याचे आदेश दिले आहेत.जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुगणालय आणि उपजिल्हा रुग्णालयातील वास्तववादी चित्र ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या प्राथमिक आरोग्यातील कामकाजात सुधारणा करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी नवाल यांनी सांगितले. गेल्या सहा महिन्यांत त्यांनी आरोग्य आणि शिक्षण या विषयांवर लक्ष केंद्रीत केलेले आहे. मात्र, या निमित्ताने काही ठिकाणी असणाऱ्या त्रुटी समोर आल्या आहेत. त्या सोडविण्यावर भर देण्यात येणार आहेत. यापुढे दर महिन्याला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत एका गावाची निवड करून त्या ठिकाणी खासगी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने सर्व रोगाचे आरोग्य शिबिर घेण्याचे आदेश तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच दररोज कोणत्याही परिस्थितीत सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रात एक वैद्यकीय अधिकारी यांना सक्तीने उपस्थित ठेवण्यात येणार आहे.या वेळेत तालुकाअधिकारी यांनी कोणत्याच बैठका घेऊ नयेत, अथवा त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलवू नये, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी रुग्णवाहिकेची अडचण आहे, त्या ठिकाणी आरोग्य विभागाच्या १०२ आणि १०८ क्रमाकांच्या टोल फ्री नंबरचा वापर करून रुग्णवाहिका बोलवून घ्यावी, जिल्ह्यात सर्वच ठिकाणी जीवनदायी योजनेच्या माहितीचे फलक लावून अधिकाधिक लोकांना या योजनेची माहिती देण्यास सांगण्यात आले आहेत.मुख्यालयात न राहणाऱ्या आरोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य विभाग अकस्मात भेटी देऊन शहानिशा करण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना आणि आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी नवाल यांनी दिलेले आहेत. पुढील सहा महिन्यात जिल्ह्यातील ६० टक्के प्राथमिक केंद्रातील कामकाज आयपीएचसी (इंडियन पब्लिक हेल्थ स्डँडर्ड) नुसार करण्यास प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी पी.बी. गंडाळ यांना सूचना दिलेल्या आहेत. रिक्त असणारी पदे भरण्यासाठी आरोग्य उपसंचालक यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)