शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अस्वस्थ वाटताच क्वाटंराईन सेंटर गाठले, इतराच्या संपर्कात न येण्याची घेतली काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 21:32 IST

दहिगावने : मुंबईहुन (कुर्ला) भावीनिमगाव (ता शेवगाव) येथे आलेल्या विलगीकरण कक्षातील ४१ वर्षीय व्यक्तीचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती दहिगावने प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास कानडे यांनी दिली. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या शेवगावात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. 

नानासाहेब चेडे

दहिगावने : मुंबईहुन (कुर्ला) भावीनिमगाव (ता शेवगाव) येथे आलेल्या विलगीकरण कक्षातील ४१ वर्षीय व्यक्तीचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती दहिगावने प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास कानडे यांनी दिली. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या शेवगावात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. कोरोना बाधित व्यक्ती एस.टी. महामंडळात चालक पदावर कार्यरत आहे. लॉकडाउनच्या काळात आपल्या घरी भावीनिमगाव (ता. शेवगाव) येथेच ते राहत होते. मात्र लॉकडाऊन शिथिल होताच त्यांना कर्तव्यावर मुंबई येथे हजर होण्याच्या सूचना प्राप्त झाल्या. त्यामुळे ते आपल्या कर्तव्यावर हजर झाले. पुन्हा सुट्टी असल्याने ते १३ जूनला गावी परतले. आल्याबरोबर कोणाच्याही संपर्कात न येता ते विलगीकरण कक्षात दाखल झाले. मात्र येथे येताच काही तासांतच त्यांना काहीसा त्रास जाणवू लागला. दहिगावने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाºयांनी प्राथमिक तपासणी केल्यानंतर तात्काळ पुढील तपासणीसाठी नगर येथे हलवले. १६ जूनला  त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले.    --------

मुंबईहून (कुर्ला) भावीनिमगाव येथे आलेली व्यक्ती थेट गावातील विलगिकरण कक्षात दाखल झाली होती. तेथून काही तासांतच त्यांना पुन्हा नगर येथे कोरोना तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यांना सोबत म्हणून रुग्णवाहिकेत त्यांचा भाऊ व आणखी एकजण असे दोघे गेले होते ते ही सिव्हिल हॉस्पिटलमध्येच आहेत. त्यामुळे गावातील इतर कोणाशीही त्यांचा संपर्क आलेला नाही. -चंद्रकांत जोशी, ग्रामविकास अधिकारी भावीनिमगाव 

---------कोरोना बाधित व्यक्तीचा गावातील कोणाशीही संपर्क आलेला नाही अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे, मात्र गाव संपूर्ण लॉकडाऊन करायचे की नाही याबाबत अजून निर्णय झालेला नाही.-मयुर बेरड, नायब तहसीलदार, शेवगाव