शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
2
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
3
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
4
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
5
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
7
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
8
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
9
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
10
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
11
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
12
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
13
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
14
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
15
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
16
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
17
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
18
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
19
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
20
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?

‘बहुजन हिताय’ ला हरताळ

By admin | Updated: July 28, 2014 00:51 IST

पारनेर : पारनेर एस.टी.आगाराचे वेळापत्रक कोलमडल्याने विद्यार्थी, प्रवाशांचे हाल होत आहेत. ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीद असलेली एस.टी.मात्र याला हरताळच फासत असल्याचे चित्र सध्या आहे.

पारनेर : पारनेर एस.टी.आगाराचे वेळापत्रक कोलमडल्याने विद्यार्थी, प्रवाशांचे हाल होत आहेत. ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीद असलेली एस.टी.मात्र याला हरताळच फासत असल्याचे चित्र सध्या आहे.पारनेर शहरात पारनेर महाविद्यालय, न्यू इंलिश स्कूल, सेनापती बापट विद्यालय, जिजामाता कन्या विद्यालय, आय.टी.आय.सह अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी तालुक्यातून सुमारे दोन ते अडीच हजार विद्यार्थी रोज पारनेरला येतात. सुपा, हंगा, भाळवणी, जामगाव, लोणी हवेली, बाबुर्डी, म्हसणे, मुंगशी, भोयरे गांगर्डा, चिंचोली, वडझिरे, पिंपरी जलसेन, करंदी, कान्हूरपठार, सिध्देश्वरवाडी, जवळे यासह परिसरातून येणारे विद्यार्र्थी एस.टी.ने प्रवास करतात. परंतु सकाळी या मार्गावरुन पारनेरकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांना एस.टी.त जागाच मिळत नाही. काही मार्गांवर एस. टी. थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेला दांडी मारावी लागते. शाळेत उशिरा गेल्यास अनेकदा शिक्षाही होते. काही मार्गांवर चारनंतर बस नसल्याने प्रवाशांचे हाल होतात. (तालुका प्रतिनिधी)प्रवासी वाढवा अभियानाला छेदएस.टी. वाहक अनेकदा वृध्दांशी अरेरावीने वागून त्यांचा अवमान करतात. एका चौथीच्या मुलीला हंगा येथील शाळेपासून दोन कि़मी.अंतरावर उतरविण्याचा धक्कादायक प्रकारही अलिकडे घडला. असे प्रकार घडत असतील तर एस.टी.ला प्रवासी कसे मिळणार.- किरण कोकाटे, प्रवासीविद्यार्थी संघर्ष समितीचे उपोषणपारनेर एस.टी.आगार प्रमुखाची बदली करावी, विद्यार्थ्यांना सुरक्षित व वेळेवर एस.टी.सेवा मिळावी, वृध्दांवर अरेरावी करणाऱ्यांवर कारवाई करावी यास इतर प्रमुख मागण्यांसाठी पारनेर तालुका विद्यार्र्थी संघर्ष समितीच्यावतीने सोमवारी पारनेर बसस्थानकासमोर उपोषण करण्यात येणार असल्याचे समितीचे अ‍ॅड.गणेश कावरे, महेश गायकवाड, तुषार औटी यांनी सांगितले. वेळापत्रक कोलमडले नाहीपारनेर आगाराचा कारभार वेळापत्रकानुसारच चालू आहे. वेळापत्रक कोलमडलेले नाही. मुलींच्या बसमध्येच विद्यार्थी गर्दी करतात. त्यांना आणखी किती बस सोडायच्या. मुले उपोषणाचे नाटक करीत आहेत. आम्ही चांगले काम करीत असताना बदलीची मागणी करण्याचा संबंध येतो कुठे?- अशोक आदिक, आगारप्रमुख, पारनेरअवैध वाहतुकीचा आधार पारनेर एस.टी. आगाराचे वेळापत्रक कोलमडल्यानंतर चालक, वाहकांवर गर्दीचा ताण पडतो. यामुळे अनेक चालक, वाहक एस.टी.मार्गांवर प्रवाशांनी हात करूनही थांबत नाही. पारनेर तहसील कार्यालय, पारनेर ग्रामीण रूग्णालय, चिंचोली, गटेवाडी फाटा, पानोेली चौक या परिसरातील थांब्यांवर एस.टी.थांबत नसल्याने प्रवाशांना अवैध वाहतुकीचा आधार घ्यावा लागतो. चालक, वाहकांची दमछाकपारनेर आगाराच्या ढिसाळ कारभाराचा फटका चालक व वाहकांनाही बसतो. सकाळी शटल गाड्यांंमुळे कमी त्रास होतो, परंतु सायंकाळी अनेक मार्गावर जादा बसेस नसल्याने मुक्कामी बस घेऊन जाणाऱ्या चालक व वाहकांवर चार नंतर विद्यालये सुटल्यानंतर होणाऱ्या गर्दीचा भार पडतो. अपघाताचे वाढते प्रमाण बसमध्ये चढण्यासाठी विद्यार्थी व प्रवाशांची गर्दी होते. अनेकदा प्रवासी दरवाजाला लोंबकळलेले असतात व दरवाजा न लावताच बस पुढे नेण्याचा धोकादायक प्रकार काही चालक करीत असल्याने बसमधून पडून किंवा गर्दीत चेंगराचेंगरी होऊन अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. भाळवणी येथे तीन मुली जखमी झाल्याची घटना नुकतीच झाली. त्यावेळी दोन तास आंदोलनही झाले.