शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५२ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

पावसाच्या गाण्यांनी सखी चिंब

By admin | Updated: July 31, 2016 23:50 IST

अहमदनगर : बाहेर पाऊसधारा आणि हुतात्मा सभागृहात ओसंडून वाहणारा उत्साह... पावसाच्या गाण्यावर एकच जल्लोष! युवती, महिला सारेच चिंब चिंब.... शनिवारी हा कार्यक्रम सखींच्या भरगच्च गर्दीत बहरला.

अहमदनगर : बाहेर पाऊसधारा आणि हुतात्मा सभागृहात ओसंडून वाहणारा उत्साह... पावसाच्या गाण्यावर एकच जल्लोष! युवती, महिला सारेच चिंब चिंब.... शनिवारी हा कार्यक्रम सखींच्या भरगच्च गर्दीत बहरला. तो अविस्मरणीय दिवस आणि रंगलेला गाण्याचा कार्यक्रम. निमित्त होते कलर्स प्रस्तुत सखी मंचच्या वतीने आयोजित ‘रिमझिम गाणी- झलक सुहानी’ कार्यक्रमाचे.गायिका अनघा काळे, रवींद्र खोमणे, गौरव पवार यांनी बहारदार गीते सादर केली. प्रत्येक गाण्याला सखींची दिलखुलास दाद हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. कार्यक्रमाचे उद्घाटन अंबिका महिला बँकेच्या अध्यक्षा शोभना चव्हाण, संस्थापिका मेधाताई काळे, अ‍ॅड.शारदा लगड, डॉ.लता फिरोदिया, शोभा खरपुडे, भारती आठरे, पुष्पा वाघ, परीक्षक कविता भामरे यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाचा प्रारंभ सूर सिंगारच्या कलाकारांनी सादर केलेल्या प्रार्थनेने झाला. त्यानंतर एकापेक्षा एक सुरेख गीते सादर करण्यात आली. चिंब पावसानं रान झालं आबादानी, सावन का महिना, आज रपट जाये तो यासारखी एकापेक्षा एक सरस गीते सादर करून कलाकारांनी सखींना धुंद पावसाची सफर घडवून आणली. जितेंद्र खिस्ती यांनी निवेदन केले.या गीतासोबत अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिच्या नृत्यावर आधारीत नृत्य स्पर्धा झाल्या. शिट्ट्या, टाळ्यांच्या गजरात सखींनी याला प्रतिसाद दिला. रिमझिम गाणी या गाण्यांच्या कार्यक्रमात गायिका अनघा काळे, रवींद्र खोमणे यांनी गायलेल्या ‘मोहब्बत बरसा देना तू’ या गीताला सखींनी भरभरून दाद दिली. सभागृह झाले झिंगाट...कार्यक्रमादरम्यान सादर करण्यात आलेल्या एकापेक्षा एक सुंदर गीतांना वन्समोअर मिळवण्यासह विविध गाण्यांची मागणी होऊ लागली. यावेळी सैराट चित्रपटातील झिंगाट गाण्याची मागणी झाली. तेव्हा गायकांनी सादर केलेल्या या गीतांवर सखींनी नृत्य करीत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. यावेळी संपूर्ण हॉल अक्षरश: झिंगाट झाला.आगळा वेगळा शो....पुन्हा एकदा कलर्स चॅनलवर ३० जुलै २०१६ पासून शनिवारी रात्री १० वाजता ‘झलक दिखला जा हॉट है’ सुरू होणार आहे. यावेळचे मुख्य आकर्षण म्हणजे २००६ ची मिस युनिव्हर्स श्रीलंका आणि सुप्रसिद्ध मॉडल जॅकलिन फर्नांडिस सेलिब्रिटी जज आहे. याशिवाय सुप्रसिद्ध फिल्म निर्देशक करण जोहर, सुप्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश हेगडे हे सुद्धा परीक्षकांच्या भूमिकेत धमाल करणार आहेत. एकूण १२ सेलिब्रिटी या ‘झलक दिखला जा हॉट है’मध्ये सहभागी होणार आहेत. ज्यात सुर्वीन चावला, करिश्मा तन्ना, शक्ति अरोरा, अर्जुन बिजलानी, गौरव गेरा (चुटकी फेम), पूनम शहा, प्रियंका शहा (जुळ्या बहिणी) हरपाल सिंग सोखी (शेफ), हेली शाह, नोरा पुतेही, सलमान युसूफ खान, सिद्धांत गुप्ता आणि शांतनु माहेश्वरी असे १० नामवंत प्रख्यात सेलिब्रिटी या शोचे आकर्षण आहेत. पण जॅकलिन फर्नांडिसच्या सहभागाने या शोला एक ग्लॅमरस आणि सिझनिंग स्वरुप आले आहे. जे या शोचे वैशिष्ट्य आहे.झलक दिखला जा नृत्य स्पर्धाकलर्स प्रस्तुत सखी मंच ‘रिमझिम गाणी झलक सुहानी’ या कार्यक्रमात कलर्स चॅनलवर सादर करण्यात येत असलेल्या ‘झलक दिखला जा हॉट है’ या डान्स शोवर आधारित नृत्य स्पर्धेने कार्यक्रमात रंगत आणली. प्रथम दहा सखींनी आपल्या नृत्याचे सादरीकरण दिले. या दहा नृत्यांगणांचा अंतिम सामना घेण्यात आला. तो खूप मनोरंजक ठरला. या दहा जणींना जॅकलीनच्या गाण्यावर जॅकलीनसारखे नृत्य करायचे होते. त्यात तीन सखींनी बाजी मारली. अनुक्रमे प्रथम सोनल तरटे, द्वितीय सारिका गाडे, तृतीय भाग्यश्री रावस या विजेत्या ठरल्या. कविता भामरे यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. विजेत्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.