शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

मांडवगण येथे जनावरांच्या छावणीत झाले शुभमंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 16:54 IST

श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथे जनावरांच्या एका छावणीत गुरुवारी दुपारी रखरखत्या उन्हात विवाह संपन्न झाला. यावेळी उपस्थिताचे डोळे आनंदाने डबडबले.

- बाळासाहेब काकडेश्रीगोंदा : लोकसभा निवडणुकीची धुम जोरात चालू आहे. या निवडणुकीत सत्तेसाठी कोट्यावधी रुपयाचा चुराडा केला जात आहे. पण कर्ज बाजारीपणा व दुष्काळाच्या जीवघेण्या संकटामुळे बळीराजाला आपल्या मुलीचे लग्न करणे डोईजड झाले आहे. श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथे जनावरांच्या एका छावणीत गुरुवारी दुपारी रखरखत्या उन्हात विवाह संपन्न झाला. यावेळी उपस्थिताचे डोळे आनंदाने डबडबले.मांडवगण येथील जनावरांच्या छावणीत ८११ जनावरे आहेत. शेतकऱ्यांच्या धनलक्ष्मीच्या उपस्थितीत मांडवगण येथील कै. किसन नाना जाधव यांचे चिरंजीव अनिल व औरंगाबाद येथील मारुती देवराम वानखेडे यांची कन्या पुजा यांनी लग्नाची रेशीमगाठी बांधली.नवदाम्पत्यांच्या खरची परिस्थिती हालाखिचीच आहे. दोन्ही कुटुंबांची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन युवक कार्यकर्ते महेश तोगे यांनी हा विवाह मांडवगण जनावरांच्या छावणीत करण्याची संकल्पना मांडली. दोन्ही परिवाराने मान्यता दिली. श्रीगोंदा येथील वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेटच्या माध्यमातून विठ्ठलराव वाडगे यांनी भोजनाची व्यवस्था केली. शेतकऱ्यांच्या उपस्थितीत गरीब कुटुंबातील वधू वरांच्या डोक्यावर अक्षदा टाकण्यात आल्या. यावेळी वधू वरांना सिद्धेश्वर देशमुख, बाळासाहेब लोखंडे, विठ्ठलराव वाडगे यांनी शुभेच्छा दिल्या.

मांडवगण येथे सेवाभावी वृत्तीने जनावरांची छावणी सुरू केली छावणीत दररोज देवीची आरती सर्व शेतकºयांना व निराधार जेवणाची व्यवस्था केली आहे छावणीत पहिला विवाह करण्याचे भाग्य लाभले छावणीत लवकरच संतकथा सुरू करणार आहे आणखी विवाह छावणीत करण्याचा मानस आहे-विठ्ठलराव वाडगे, अध्यक्ष वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट श्रीगोंदा

मांडवगण येथील जनावरांच्या छावणीत विवाह करण्याचा उपक्रम राबविला आहे इतर छावणी चालकांनी सामाजिक जाणिवेतून असे उपक्रम राबवून शेतकरी व गोरगरिब नागरिकांना दिलासा दिला पाहिजे- महेंद्र महाजन, तहसिलदार श्रीगोंदा

दुष्काळामुळे आमचा विवाह शाही थाटात करणे घरच्यांना शक्य नव्हते अशा परिस्थितीत जनावरांच्या छावणीत विवाह झाला वैवाहिक जीवनाची सुरुवात छावणीत झाली अतिशय समाधान वाटले़- अनिल व पुजा, नवदाम्पत्य

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा