शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘पीसीओ’टीमवर नगरकरांचा शुभेच्छांचा वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 12:39 IST

राज्यातील मानाचा ‘पुरुषोत्तम करंडक’ जिंकणाऱ्या पेमराज सारडा महाविद्यालयाच्या ‘पीसीओ’ एकांकिकेतील कलावंतांचा ‘लोकमत’ व छत्रपती शाहू विकास प्रतिष्ठानने गौरव केला. 

ठळक मुद्दे प्रयोग पाहून भारावले नगरकर : ‘लोकमत’ व शाहू प्रतिष्ठानने केला गौरव; हाऊसफुल्ल सभागृहात टाळ्यांचा कडकडाट

अहमदनगर : राज्यातील मानाचा ‘पुरुषोत्तम करंडक’ जिंकणाऱ्या पेमराज सारडा महाविद्यालयाच्या ‘पीसीओ’ एकांकिकेतील कलावंतांचा ‘लोकमत’ व छत्रपती शाहू विकास प्रतिष्ठानने गौरव केला. हाऊसफुल्ल सभागृहात टाळ्यांच्या कडकडाटात आणि नाट्यरसिकांच्या उपस्थितीत या एकांकिकेचे नगरकरांसमोर सादरीकरण झाले. हा प्रयोग पाहून नगरकरही भारावले. प्रयोग संपला तरीही अनेकजण सभागृहात खिळून राहिले होते. गतवर्षीच्या पुरुषोत्तम विजेत्या ‘माईक’ टीमचाही सत्कार करण्यात आला.जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, सहाय्यक आयकर आयुक्त प्रशांत गांधले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, ‘एल अ‍ॅण्ड टी’चे सरव्यवस्थापक अरविंद पारगावकर यांच्या हस्ते ‘पीसीओ’ व ‘माईक’ एकांकिकेतील कलाकारांचा गौरव करण्यात आला. ‘पीसीओ’ एकांकिकेतील कलाकारांना प्रोत्साहन देणारे हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, सचिव सुनील रामदासी, अ‍ॅड. अनंत फडणीस, प्राचार्या डॉ. अमरजा रेखी यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. नटराज पूजन करुन या गौरव सोहळ्याचा प्रारंभ झाला. ‘लोकमत’चे आवृत्तीप्रमुख सुधीर लंके यांनी प्रास्तविक केले. उपसरव्यवस्थापक नरेंद्र अंकुश, छत्रपती शाहू विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष सीए राजेंद्र काळे यांनी स्वागत केले. नगरसेविका मनिषा बारस्कर-काळे यांनी आभार मानले. ‘लोकमत’चे वरिष्ठ उपसंपादक सुदाम देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रमास चित्रकार प्रमोद कांबळे, अनुराधा ठाकूर, गायक पवन नाईक, रसिक गु्रपचे अध्यक्ष जयंत येलूलकर, रंगकर्मी पी. डी. कुलकर्णी, सतीश लोटके, शशिकांत नजान, सतीश डांगे, ‘सरगम’चे अध्यक्ष प्रा. राम शिंदे, हवामानतज्ज्ञ प्रा. बी. एन. शिंदे, अ‍ॅड. सतीशचंद्र सुद्रिक, प्रा. साताप्पा चव्हाण, प्रा. सतीश कुलकर्णी आदी उपस्थित होते़‘पीसीओ’ टीमला आर्थिक मदतस्वराज्य कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष आकाश दंडवते यांनी कामगारांच्यावतीने ‘पीसीओ’ टीमला आर्थिक मदत दिली. या मुलांनी नगरचे नाव उंचावले असल्याची भावना त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली़जिल्हाधिका-यांकडून ‘पीसीओ’चे कौतुकजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कलाकारांचा सत्कार करुन अखेरपर्यंत आवर्जून एकांकिका पाहिली. ‘अत्यंत सुंदर प्रयोग बघण्याची संधी मिळाली. एकांकिकेचे लेखन, दिग्दर्शन आणि सर्वच कलाकारांचा अभिनय उत्तम आहे. या मुलांनी नगरचे नाव मोठे केले, याचा जिल्हाधिकारी म्हणून मलाही अभिमान आहे.  मलाही ही गोष्ट सर्वत्र अभिमानाने सांगता येईल,’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.‘पीसीओ’ एकांकिकेने मानाचा पुरुषोत्तम जिंकल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये वाचले. त्याचवेळी या मुलांचे कौतुक करण्याचे मनात आले होते. हा योग आज ‘लोकमत’मुळे जुळून आला. गत वर्षीही नगरच्या कलाकारांनी हा करंडक जिंकला हे विशेष. गेल्या ३६ वर्षांतील बॅकलॉग भरुन काढण्यासाठी नगरी कलाकारांना शुभेच्छा. या करंडकामुळे सांस्कृतिक क्षेत्रात नगरचे नाव उंचावले, त्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी असल्याचा मला अभिमान वाटतो, असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले.पीसीओ आणि माईक एकांकिकेतील कलाकारांचा सत्कार करण्याची संधी मिळाली ही आनंददायी बाब आहे. कलावंतांच्या पाठिशी राहणे हे आपले कर्तव्यच आहे, ते ‘लोकमत’ सोबत निभावता आले याचा आनंद आहे.- मनिषा काळे-बारस्कर, नगरसेविका

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLokmatलोकमत