शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

 सुखाची प्राप्ती पुण्यामुळेच होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 13:55 IST

चिरंतन सुख हे केवळ पुण्यामुळे प्राप्त होते. पैसा, परिवार किंवा आरोग्य यापासून सुख मिळते अशी भावना असते, पण ते खोटे आहे. पैसा, परिवार, आरोग्य या चिरंतन टिकणा-या गोष्टी नाहीत. पुण्य करीत असाल तर चिरंतन सुखाची प्राप्ती होईल.

सन्मतीवाणीचिरंतन सुख हे केवळ पुण्यामुळे प्राप्त होते. पैसा, परिवार किंवा आरोग्य यापासून सुख मिळते अशी भावना असते, पण ते खोटे आहे. पैसा, परिवार, आरोग्य या चिरंतन टिकणा-या गोष्टी नाहीत. पुण्य करीत असाल तर चिरंतन सुखाची प्राप्ती होईल. पैशाचा किंवा आरोग्याचा भरवसा नसतो. परिवार देखील नेहमी सुख देईल याची शाश्वती नसते म्हणून जितके जास्त पुण्य करता येईल त्यावरच आपले सुख अवलंबून आहे.ज्यांच्याकडे धन असून देखील परोपकारवृत्ती नसेल तर ते फक्त व्यावहारीकदृष्ट्या श्रीमंत आहेत. अंतरंगातून मात्र ते गरीब आहे. पाप, पुण्याचा चांगला परिणाम दिसून येतो. पाप- पुण्य आपण स्वत:च करतो. त्यामुळे त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. पुण्य हवे असेल तर दान किंवा शुभयोग आवश्यक असतात. काही लोकांना पाप करताना भीती वाटत नाही. अखेर त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतात. आपल्या उत्पन्नाचा काही भाग दान करण्यासाठी बाजूला काढून ठेवावा त्यामुळे पुण्य वाढते. ज्यांना खरेच गरज आहे त्यांनाच दान करावे. म्हणजे त्याचा सदुपयोग होतो. पैसा साठवून ठेवू नका. दान केला तर सदुपयोग होईल. पण जर एखादेवेळी आयकर खात्याची धाड पडली तर ते पैसे सरकार जमा होतील. त्यापेक्षा गरजूंना दान करणे महत्त्वाचे आहे. पुण्यानुबंध व पापनुबंध पुण्य असे पुण्याचे दोन प्रकार आहेत. पुण्यातून पुण्य वाढविणे यालाच पुण्यानुबंध म्हणतात. पण पुण्यातून पापाची कर्म केली तर त्याचा उपयोग होत नाही. संत संगत, ज्ञानाचे चिंतन केले तर पुण्य लाभते. पुण्यांचे महत्त्व जाणून घ्या आणि पुण्य वाढविण्याचा प्रयत्न करा.    - पू. श्री. सन्मती महाराज

टॅग्स :Shrirampurश्रीरामपूरJain Templeजैन मंदीर