शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्तीतून तांदुळवाडी झाले हरितग्राम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 18:05 IST

तालुक्यातील तांदुळवाडी हे सहा हजार लोकवस्तीचे गाव़ महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत २०१३-१४ मध्ये सहभागी झाले़ सात लाख रूपयांचा शासनाकडून पुरस्कार मिळाला़

ठळक मुद्देघरोघरी बहरली आंब्याची झाडे गुणीजनांच्या पाठीवर शाबासकीची थापसाडीचोळी देऊन झाले स्त्री जन्माचे स्वागत

भाऊसाहेब येवलेराहुरी : तालुक्यातील तांदुळवाडी हे सहा हजार लोकवस्तीचे गाव़ महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत २०१३-१४ मध्ये सहभागी झाले़ सात लाख रूपयांचा शासनाकडून पुरस्कार मिळाला़ पुरस्काराच्या रकमेतून विविध उपक्रम राबविले़ घरासमोर व शेतात लावण्यासाठी एक हजार अांब्याची झाडे लावल्याने आज हे गाव हरितग्राम झाले आहे.आंब्याचं गाव म्हणून या गावची ओळख झाली आहे.तांदुळवाडीच्या ग्रामसभेत तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी इंद्रभान पेरणे यांची तर उपाध्यक्षपदी विनीत धसाळ यांची निवड करण्यात आली़ समितीने गावातले तंटे गावातच मिटविण्याचा निर्णय घेतला़ गावकऱ्यांनी साथ दिल्याने तंटे गावातच मिटले़ शासनाने दखल घेऊन तत्कालीन तहसीलदार राजश्री आहिरराव, पोलीस निरीक्षक संजय पाटील, जिल्हा बँकेचे संचालक अरूण तनपुरे यांच्या हस्ते गावाला तंटामुक्तीचा सात लाख रूपयांचा पुरस्कार देण्यात आला.प्रत्येक कुटुंबाला आंबे चाखायला मिळावे म्हणून एक वर्ष वयाची झाडे तत्कालीन गटविकास अधिकारी ईशाधीन शेळकं दे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले़ गावकºयांनी लहान मुलांप्रमाणे आंब्याच्या झाडांचे संगोपन केले़ यंदा आंब्याची झाडे बहरली़ पर्यावरण व आरोग्य यादृष्टीने आंब्याची झाडे पूरक ठरली़ गावाचे सुशोभिकरण व्हावे म्हणून पुरस्काराच्या रकमेतून कमान उभारण्यात आली़ स्त्री जन्माचे स्वागत १०० मातांना साडी चोळी देऊन करण्यात आले़ खेळाडू, गुणवंत विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांचा स्मृतिचिन्ह व गौरवपत्र देऊन सन्मान केला.गावक-यांना कायमस्वरूपी आठवण राहावी व पर्यावरणाला हातभार लावावा म्हणून गावक-यांना आंब्याची रोपे वाटण्यात आली़ आजही ९० टक्के तंटे हे गावातच मिटतात़ त्यामुळे वेळ व पैशाची बचत होते़ गावक-यांनी साथ दिल्याने विविध उपक्रम राबविणे शक्य झाले.- -विनीत धसाळ, अध्यक्ष, तंटामुक्ती समिती.चांगल्या भावनेने आम्हाला आंब्याची रोपे दिली़ आम्ही योग्य पध्दतीने संगोपन केले़ पुढील पिढीला आंब्याची फळे चाखण्यास संधी उपलब्ध झाली़ गावात एकोपा निर्माण झाला. - सविता भांबळ, ज्येष्ठ नागरिक.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी