यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, माजी आमदार वैभव पिचड, गिरजाजी जाधव, जालिंदर वाकचौरे, सोनाली नाईकवाडी, विजय भांगरे, भाऊसाहेब पुंजा वाकचौरे, मच्छिंद्र मंडलिक, दत्ता देशमुख, माधवी जगधने, राजू डावरे, बाळासाहेब वडजे, प्रकाश नाईकवाडी, नामदेव पिचड, चंद्रकला धुमाळ आदी उपस्थित होते.
यावेळी अकोले येथील महावितरण वीज कार्यालयास कुलूप लावत निदर्शने करून महावितरण व आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या संबंधित महावितरण कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर बागुल यांना निवेदन देखील देण्यात आले.
पिचड म्हणाले, महावितरणकडून राज्यभर ७५ लाख वीज ग्राहकांना वीज कनेक्शन तोडण्यासाठी नोटीसा पाठवून ४ कोटी जनतेला अंधारात ठेवण्याचे पाप हे आघाडी सरकार करू पाहत आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्वं व्यवहार, व्यवसाय बंद असताना देखील महावितरण व आघाडी सरकारने वीज ग्राहकांना अव्वाचे सव्वा वीजबिल पाठवून दिले. आधीच आघाडी सरकारने हे कोरोना काळातील वीजबिल जनतेला माफ करू, अशी घोषणा केली. आता त्या घोषणेवर ते घुमजाव करून आता त्यांनी वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश महावितरणला दिले आहेत. हा निर्णय अतिशय चुकीचा आहे.
यावेळी महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. महाविकास आघाडी आणि महावितरणाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
( ०५ अकोले)