शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-निर्मळ महामार्गाचे काम अर्धवट; साईडपट्ट्या खोदल्याने अपघात वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 14:30 IST

कल्याण-नांदेड-निर्मळ  महामार्ग (क्र. ६१) खड्ड्यांच्या विळख्यात अडकला आहे. रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत बंद असल्याने अनेक ठिकाणी उकरलेल्या साईडपट्ट्यांचा अंदाज न आल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.

मतीन मणियार ।  मढी : पाथर्डी तालुक्यातून जाणारा कल्याण-नांदेड-निर्मळ  महामार्ग (क्र. ६१) खड्ड्यांच्या विळख्यात अडकला आहे. रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत बंद असल्याने अनेक ठिकाणी उकरलेल्या साईडपट्ट्यांचा अंदाज न आल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. मागील तीन वर्षात अपघातांमुळे जवळपास पावणे दोनशे मृत्यू  झाले आहेत. तरीही महामार्ग प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे.जमीन हस्तांतर होऊन २०१४ मध्ये कल्याण-निर्मळ महामार्गाचे काम सुरू झाले. सुरुवातीच्या टप्प्यात अगदी वेगात काम सुरू होते. पाथर्डी तालुक्यात हा महामार्ग करंजी घाट ते खरवंडी कासार असा ५० किलोमीटरचा आहे. १० मीटर रूंदी असणा-या रस्त्याचे काम जून २०१७ पूर्वीच पूर्ण होणे गरजेचे होते. परंतु, मागील पाच वर्षे कासवगतीने काम सुरू आहे. काही ठिकाणी पुलांचे रखडलेले रुंदीकरण काही केल्या पुढे सरकायला तयार नाही. रस्त्याच्या कामासाठी अनेक ठिकाणी साईडपट्ट्या खोदलेल्या तशाच आहेत. त्या ठिकाणी तीन ते चार फुटांचे खड्डे पडले आहेत. मध्यंतरी खासदार डॉ. सुजय विखे यांनी पाथर्डी येथे महामार्ग प्रशासन व ठेकेदार संस्था यांची बैठक घेऊन चर्चा केली होती. मात्र तरीही कोणतीच ठोस कारवाई झाली नाही. काही दिवसांपूर्वीच खड्डे बुजविण्यास सुरुवात झाली होती. मात्र त्यातही दुजाभाव दिसतो. काही ठिकाणी खड्डे बुजविण्याचे कामही अर्धवट सोडून दिल्याचे दिसते. या रस्त्याचे काम तत्काळ सुरू करावे अशी मागणी तिसगावचे सरपंच काशिनाथ लवांडे, मढीचे बबन मरकड, चक्रधर ससाणे, गणेश कर्डिले, पिंटू परमार, शेकापचे तालुकाध्यक्ष संदीप अकोलकर यांनी केली आहे.माझा एकुलता एक मुलगा या रस्त्यावरून रोज नगरला ये-जा करतो. रस्त्याची अवस्था बघता मुलगा सुखरूप घरी येईपर्यंत जीवाला काळजी लागलेली असते, असे करंजी येथील रहिवासी विमल अकोलकर यांनी सांगितले.

या कामाची ठेकेदार कंपनी आर. बी. के. ने काम करण्यास असमर्थता दर्शवली आहे. लवकरच नियुक्त केलेला नवीन ठेकेदार काम सुरू करणार आहे, असे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१ चे डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर दिनेश जोशी यांनी सांगितले.  

टॅग्स :kalyanकल्याणroad safetyरस्ते सुरक्षा