शेख नासिर अहमद चाँदमिया, शेख अय्याज नासीर, सय्यद असीफ महेमूद (तिघे रा. भिंगार), आबेद नासिर शेख (रा. नागरदेवळे, ता. नगर), सादिक खान इमाम पठाण अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. नगर-दौंड रोडने गुटख्याची तस्करी होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यानंतर सहायक निरिक्षक इंगळे, दिवटे, सहायक फौजदार मन्सूर सय्यद, हेड कॉस्टेबल संदीप पवार, संदीप घोडके, दिनेश मोरे, पोलीस नाईक शंकर चौधरी, लक्ष्मण खोकले, सचिन अडबल, रविकरण सोनटक्के आदींच्या पथकाने आरणगाव चौकात दोन टेम्पो ताब्यात घेऊन तपासणी केली तेव्हा त्यामध्ये हिरा गुटखा व रॉयल कंपनीची तंबाखू मिळून आली. याप्रकरणी आरोपींविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
...............
फोटो ०५ गुटखा
ओळी- गुटखा, तंबाखू तस्करी करणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने मुद्देमालासह अटक केली.