शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री म्हणतात, विजयादशमीला कोरोनाचे दहन करू, मात्र लॉकडाऊन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 22:27 IST

अहमदनगर : केंद्र सरकार लॉकडाऊनला आता परवानगी देत नाही. नगर जिल्ह्यात लॉकडाऊन नाही तर जनता कर्फ्यू लावण्याबाबत स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा. पालकमंत्री म्हणून त्याला सहकार्य असेल. मात्र, प्रशासन त्यात सहभागी होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनी पत्रकारांसमोर मांडली.

अहमदनगर : केंद्र सरकार लॉकडाऊनला आता परवानगी देत नाही. नगर जिल्ह्यात लॉकडाऊन नाही तर जनता कर्फ्यू लावण्याबाबत स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा. पालकमंत्री म्हणून त्याला सहकार्य असेल. मात्र, प्रशासन त्यात सहभागी होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनी पत्रकारांसमोर मांडली.

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, आमदार आशुतोष काळे, महापौर बाबासाहेब वाकळे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, आयुक्त श्रीकांत मायकलवार, आरोग्य यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, जनता कर्फ्यू लावण्याआधी दोन दिवस आणि संपल्यानंतर पुढे काही दिवस लोक बाजारात गर्दी करतात. त्यामुळे दहा दिवस केलेल्या कर्फ्यूचा काहीही फायदा होत नाही. दहा दिवसात घरात राहून जे कमवायचे ते एका दिवसात घालवायचे, असे लॉकडाऊनमुळे घडते आहे. त्यामुळे कर्फ्यूचा काहीच उपयोग होत नाही. तरीही स्थानिकांनी कर्फ्यूबाबत निर्णय घेतला तर त्याला सहकार्य केले जाईल. तालुक्यातील खासगी डॉक्टरांनी पुढे येऊन एखादे कोविड सेंटर चालू करायचे ठरवले तर त्याला स्थानिक स्वराज्य संस्थांनी जागा, सेवा, जेवण व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. त्यामुळे सरकारी यंत्रणेवर ताण पडणार नाही. सरकारी दराच्या पन्नास टक्के दराने त्यांनी उपचार करावेत.

पॉझिटिव्ह आहेत त्यांना घरात राहण्याची अद्याप नगर जिल्ह्यात परवानगी देण्यात आलेली नाही. कोल्हापूर जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांना होम क्वारंटाईनची सवलत दिलेली आहे. तिथे १२ हजार अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहेत. नगर जिल्ह्यात अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या चार हजारांच्या आसपास असते. त्यामुळे नगर जिल्ह्यात अद्याप पॉझिटिव्ह रुग्णांना घरातच थांबण्याबाबत परवानगी दिलेली नाही. आज जिल्ह्यात पुरेसे बेड उपलब्ध असून रुग्णांना उपचारही मिळत आहेत. त्यामुळे सध्या होम क्वारंटाईनची परवानगी देण्याची गरज नसल्याचे मुश्रिफ म्हणाले.----------मोहिमेत २५ टक्के रुग्ण वाढतील‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ या मोहिमेतून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. लोकांनी अंगावर दुखणे काढू नये. रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करणे व त्यांना बरे करणे हा या मोहिमेचा उद्देश असणार आहे. त्यामुळेच जिल्ह्यात साडेसहा हजार बेड तयार ठेवण्यात आले आहेत. २५ आॅक्टोबरला विजयादशमीच्या मुहूर्तावर कोरोनारुपी रावणाचे दहन करण्याचा निश्चय प्रशासनाने केला आहे. घरोघरी आरोग्य दूत म्हणून काम करणाºयांची जबाबदारीशासनानेघेतलीआहे. शासन किती पुरणार, त्यापेक्षा लोकांचीच जबाबदारी वाढली आहे. म्हणून ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ ही आता लोकचळवळ बनली पाहिजे. रशियाची लस मिळाली तर लोकांच्या मनातील भीती कमी होईल.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरHasan Mushrifहसन मुश्रीफ