शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
5
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
6
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
7
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
8
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
9
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
10
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
11
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
12
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
13
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव
14
लेखी परीक्षा होणार कडेकोट बंदोबस्तात, गैरप्रकार टाळण्यासाठी नवी मुंबई पालिकेचे पोलिस खात्याला पत्र
15
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
16
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
17
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
18
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
19
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
20
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?

टिळक यांच्या स्मृतीशताब्दी निमित्त अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 12:48 IST

मराठी ख्रिस्ती साहित्य परिषद व ख्रिश्चन सोशल फेडरेशनच्या वतीने ख्रिस्त संतकवि आचार्य नारायण वामन टिळक यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त सिध्दार्थनगरच्या स्मशानभूमीतील त्यांच्या स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

अहमदनगर : मराठी ख्रिस्ती साहित्य परिषद व ख्रिश्चन सोशल फेडरेशनच्या वतीने ख्रिस्त संतकवि आचार्य नारायण वामन टिळक यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त सिध्दार्थनगरच्या स्मशानभूमीतील त्यांच्या स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष रॉबर्ट निकाळजे समवेत ख्रिश्चन सोशल फेडरेशनचे अध्यक्ष रेव्ह.जी.एन. साळवे, राजू देठे, संजय आढाव, अ‍ॅड. विनायक पंडित, रेव्ह. देवदत्त कसोटे, रवी चांदेकर, मार्टिन पारधे, नंदकुमार उजगरे, प्रशांत घोडके, राजू शिंदे, डेव्हिड साळवे उपस्थित होते.या अभिवादन कार्यक्रमात देवदत्त कसोटे यांनी टिळक यांच्या साहित्य सेवेचा गौरव करुन, त्यांच्या कायार्ला उजाळा दिला. टिळक यांनी रचलेले अभंग व लिहिलेले ख्रिस्त गायन ही ख्रिस्ती समाजाला एक अमोल देणगी असल्याचे परिषदेचे अध्यक्ष रॉबर्ट निकाळजे यांनी म्हटले. तसेच टिळक संत साहित्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांच्या नावे पुरस्कार व मराठी ख्रिस्ती साहित्य अकादमी सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. अ‍ॅड. विनायक पंडित यांनी महापालिकेकडे टिळकांचे स्मृतीस्थळ सुशोभीकरण करण्याचे व त्याचे जतन करण्याची मागणी केली असल्याचे सांगितले. याप्रसंगी फेडरेशनचे अध्यक्ष जी. एन. साळवे यांनी अभिवादन प्रार्थना करून समपोचित संदेश दिला. उपासनेस रवी चांदेकर यांनी ही प्रार्थना केली. राजू देठे यांनी उपस्थितांचे आभार मानले. उपस्थितांनी नारायण वामन टिळक यांच्या स्मृतीस्थळी परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर