शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगाव शहरात महामानवास अभिवादन

By | Updated: December 8, 2020 04:17 IST

कोपरगाव : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोपरगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विविध संघटनांच्या ...

कोपरगाव : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोपरगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विविध संघटनांच्या वतीने रविवारी (दि.६) पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

भारतीय बौद्ध महासभा व बहुजन विकास एकता समितीच्या वतीने जिल्हा सचिव रामदास सोनवणे, समता सैनिक जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र जगताप, तालुकाध्यक्ष पंडित भारूड, कोषाध्यक्ष रावसाहेब वाघ, उपाध्यक्ष संतोष मैंद, शहराध्यक्ष अनिता साळवे, उपाध्यक्ष उज्ज्वला पवार, माजी पोलीस अधीक्षक के. पी. रोकडे, माजी न्यायमूर्ती जे. सी. हुसाळे, बहुजनचे मछिंद्र खरात, रावसाहेब पाईक, नगरसेवक संजय पवार, माजी नगरसेविका माया खरे, नगरसेविका हर्षदा कांबळे, सीमा जगताप, वत्सला दिवे, आर. पी. आयचे अध्यक्ष जितेंद्र रणशूर, बुद्धिस्ट यंग फोर्सचे विजय त्रिभुवन, दगडू पवार, नानासाहेब साळवे आदी यावेळी उपस्थित होते.

लोक जनशक्ती पार्टीचे अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष विलास आहिरे यांनीही शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी घटनाकार मैत्रीसंघाचे अध्यक्ष नितीन बनसोडे, गौतम बनसोडे, लोक जनशक्ती पार्टीचे कोपरगाव शहराध्यक्ष मुश्ताक बागवान, अनिल आवारे, विशाल आव्हाड, फारूक बागवान, करीम पठाण, नदीम बागवान, जीवन काळे, सुनील जाधव, अल्ताफ बागवान, प्रसाद माळी, विशाल भोसले आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. नितीन पोळ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सुजल चंदनशिव, विशाल आव्हाड, बाबा ससाणे, मयूर औताडे, अमर नेहे, रतन भारती, दत्तू घोडेराव, विजय पेटारे, अनिल आवारे, सोपान सावंत, रफिक तांबोळी, सागर वैरागळ, किशन भालेराव, कैलास कुऱ्हाडे, गोरख दुशिंग, सनी आवारे, उमेश पगारे, गिरीष शेवाळे, लक्ष्मण त्रिभुवन, गणेश विसपुते उपस्थित होते. कोपरगाव तालुका महिला काँग्रेसच्या सरचिटणीस सविता विधाते यांनी शहरातील खडकी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ॲड. दीपक जाधव, संदीप पवार आदी उपस्थित होते.