डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य विकी घायतडक यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली. तसेच सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, बाजार समिती येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले.
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त साठेनगर येथील कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक थोरात, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, वंचित बहुजन आघाडीचे ॲड. अरुण जाधव, सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले, काँग्रेसचे जमीर सय्यद, शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद, डाॅ. कैलास हजारे, शिवप्रतिष्ठानचे पांडुरंग भोसले, कुसडगावचे माजी सरपंच डॉ. प्रदीप कात्रजकर, प्रताप पवार, विजय जाधव, उत्तम पवार, भारतीय बौद्ध महासभेच्या सुरेखा सदाफुले, रत्नाकर सदाफुले, भाऊराव घायतडक, आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी साठेनगरचे अध्यक्ष किशोर काबंळे, रवी डाडर, शेखर मोरे, दादा डाडर, बाळू डाडर, सागर कांबळे, विवेक डाडर, अतिश डाडर, मनोज डाडर, सुमित डोलारे, राम गाडे, लखन गाडे, अजित घायतडक, प्रमोद सदाफुले, कुमार गाडे, संतोष राऊत, कपिल राऊत, सोनू क्षीरसागर, प्रशांत काळे यांनी परिश्रम घेतले. विजयकुमार जाधव यांनी सूत्रसंचालन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य प्रा. विकी घायतडक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बापूसाहेब गायकवाड, प्रदीप टापरे, संतोष गर्जे, गोकुळ गायकवाड, दीपक सदाफुले, सागर सदाफुले, गौरव सदाफुले, अमोल सदाफुले, सुरेखा सदाफुले, अनिल सदाफुले, शिवाजी गायकवाड, योगेश घायतडक, सुमित घायतडक, यशवंत काकडे, सुकेंद्र सदाफुले, शैलेश सदाफुले उपस्थित होते.
...............
( फोटो - जामखेड शहरातील साठेनगर येथे साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना सहायक पोलीस निरीक्षक महेश जानकर, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, विकीभाऊ सदाफुले व जमीर सय्यद.)