शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

हिरडा अन् बेहड्याला मिळणार हमीभाव; जंगलमालाला मिळाली ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 15:40 IST

अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील जंगलमाल म्हणून ओळखल्या जाणा-या हिरडा व बेहड्याला आता हमीभाव मिळणार आहे.

अकोले/राजूर : अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील जंगलमाल म्हणून ओळखल्या जाणा-या हिरडा व बेहड्याला आता हमीभाव मिळणार आहे. केंद्र शासन पुरस्कृत किमान आधारभूत गौण वन उपज योजनेच्या नवीन परिपत्रकानुसार प्र्रतिकिलोला हिरड्यास  १५ रुपये तर बेहड्याला १७ रुपये असा भाव मिळणार आहे.    गौण वन उपज योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली नऊ जणांची समिती गठीत करण्यात आली आहे. अकोले तालुक्याच्या आदिवासी भागात भात हे मुख्य पीक ओळखले जाते. भात शेती पावसाच्या लहरीपणावर अवलंबून असते. पावसाळ्यानंतर या परिसरातील जंगलातील मुख्य पीक म्हणून हिरडा आणि बेहडा यांची ओळख आहे. खरिपानंतर शेतकरी जंगलातील हिरडा आणि बेहडा गोळा करून गुजराण करतो. गोळा केलेला जंगली माल आदिवासी विकास महामंडळ खरेदी करते.  राज्यात मोह, करंज, चिंच, वावडिंग, शिककई ४९ वन उपज आहेत. यातील हिरडा आणि बेहडा हे वन उपज प्रामुख्याने नगर आणि पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. या दोन वन उपजांची खरेदी आदिवासी विकास महामंडळामार्फत प्रामुख्याने खरेदी केली जाते. राज्यातील इतर आदिवासी जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळ शेतक-यांचे धान खरेदी योजना सुरू आहे. मात्र अकोलेत धान खरेदी योजना बंद आहे. खावटी कर्ज वितरणही मागील दोन वर्षापासून बंद आहे. रोजंदारी शिवाय त्यांना पर्याय उरलेला नव्हता. याबाबत आदिवासी संघटनांनी प्रश्न उपस्थित केला होता. यासाठी  केंद्र शासनाची केंद्रीय किमान आधारभूत वन उपज खरेदी योजना अस्तित्वात आली. उपजिल्हाधिकारी यांच्या बैठकीत समिती गठीत करण्यात आली आहे. बैठकीत या कृती आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. याबाबत संबंधिताना सूचना दिल्या आहेत. हिरडा, बेहड्याचा हमी भाव व्यापा-यांनी द्यावा. हमी भावापेक्षा कमी दराने जंगलातील माल घेऊ नये. शेतकºयांचा माल घेतल्यावर त्याची पावती द्यावी, असे आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक एस. बी.पाटील यांनी सांगितले.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले