युनायटेड सिटी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार अरुणकाका जगताप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, नगरसेवक गणेश भोसले, अविनाश घुले, प्रकाश भागानगरे, माजी उपमहापौर नजीर शेख, संजय चोपडा, रफिक मुन्शी, प्रॉमिनंटचे जावेद शेख, उबेद शेख आदींची यावेळी प्रमुख उपस्थित होती.
मेडिकल डायरेक्टर डॉ. इम्रान शेख यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पीयूष मराठे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. रोहन धोत्रे, डॉ. विनील शिंदे, डॉ. प्रशांत तांदळे, डॉ. आकाश दांगट, डॉ. अमोल कासवा, डॉ. अतुल गुगळे, डॉ. सुवर्णा होशिंग, डॉ. धनंजय वारे, डॉ. आसाराम भालसिंग, डॉ. महेश घुगे, डॉ. कृष्णा कलवानी, डॉ. शशांक मोहोळे, डॉ. स्नेहलता सायंबर, डॉ. दीपाली फाळके, डॉ. दिलीप फाळके, डॉ. मुकुंद तांदळे, डॉ. चंद्रकांत शिरसूल, डॉ. विद्याधर त्र्यंबके, डॉ. चंद्रकांत केवळ, डॉ. शबनम शेख, डॉ. संजय आसनानी, डॉ. शीतल तांदळे, डॉ. सुशील नेमाणे आदी उपस्थित होते. (वा. प्र.)
..................
फोटो ओळी
अहमदनगर : युनायटेड सिटी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार. समवेत आमदार अरुणकाका जगताप, आमदार संग्राम जगताप, मेडिकल डायरेक्टर डॉ. इम्रान शेख, डॉ. पीयूष मराठे आदी.