शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसभांवरुन नगर जिल्ह्यात ग्रामसेवकांची कोंडी; संघटना म्हणते गैरहजर रहा, जिल्हा परिषद सांगते हजर व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 21:18 IST

प्रजासत्ताकदिनी गावोगावी बोलविलेल्या ग्रामसभांना उपस्थित न राहण्याचा निर्णय ग्रामसेवकांनी गुरुवारी जाहीर केला आहे. तर जिल्हा परिषदेने ग्रामसेवकांना हजर राहण्याचे आदेश बजावले आहेत.

अहमदनगर : प्रजासत्ताकदिनी गावोगावी बोलविलेल्या ग्रामसभांना उपस्थित न राहण्याचा निर्णय ग्रामसेवकांनी गुरुवारी जाहीर केला आहे. त्यामुळे शुक्रवारी राज्यभर होणा-या ग्रामसभांवर आंदोलनाचे सावट असणार आहे. तर जिल्हा परिषदेने ग्रामसेवकांना हजर राहण्याचे आदेश बजावले आहेत. त्यामुळे ग्रामसेवक काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.ग्रामसेवकांचा कंत्राटी सेवाकाळ नियमित करणे,ग्रामसेवकासाठी पदवीधरची अट असावी, नरेगासाठी स्वतंत्र विभाग, ग्रामसभेला पोलीस संरक्षण मिळावे, या मागण्यांसाठी राज्य ग्रामसेवक संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपासले आहे. प्रजासत्ताकदिनी गावातील ध्वजावंदनास उपस्थित राहू़ पण, ग्रामसभेला जाणार नाही, असा इशारा राज्य ग्रामसेवक संघटनेने यापूर्वीच दिलेला आहे. ग्रामसेवकांनी बुधवारी राज्यातील सर्व जिल्ह्यांत मूक मोर्चा काढला होता. मात्र ग्रामसेवकांच्या मागण्यांची दाखल घेतली गेली नाही. दरम्यान जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिका-यांनी ग्रामसेवकांना ग्रामसभांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात २७ हजार ५३६ ग्रामपंचायती आहेत़ राज्यातील २२ हजार ग्रामसेवक ग्रामपंचायतींचे कामकाज पाहतात. परंतु, गावाच्यादृष्टीने महत्वाच्या असलेल्या ग्रामसभेला ते हजर राहणार नाहीत. त्यामुळे ग्रामसभेबाबत संभ्रमाचे वातावरण आहे़ ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ६ नुसार प्रजासत्ताकदिनी ग्रामसभा घेण्याचे संकेत आहेत. परंतु, सार्वजनिक सुट्टी असल्याने इतर कर्मचारी उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे सभेचा मूळ उद्देश साध्य होत नाही. स्थानिक पातळीवर चर्चा करून २७ ते ३० जानेवारी, या काळात ग्रामसभा घेण्याची ग्रामसेवकांची तयारी असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

ग्रामसेवकांच्या विविध मागण्यांबाबत सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला. परंतु, सरकारने दखल घेतली नाही. त्यामुळे प्रजासत्ताकदिनी होणा-या सभेला राज्यातील ग्रामसेवक हजर राहणार नाहीत. त्यानंतर ग्रामसभा घेऊन वेळेत अहवाल सादर केला जाईल.-एकनाथ ढाकणे, अध्यक्ष, राज्य ग्रामसेवक युनियन

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर