शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकासह उपसरपंच,सदस्यांना कोंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 16:44 IST

चौदाव्या वित्त आयोगाचा भरपूर निधी असूनही खर्च करण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ मांडवे (ता. पाथर्डी) येथील संतप्त ग्रामस्थांनी शुक्रवारी ग्रामसेवक, उपसरपंच व सदस्यांना कार्यालयात चार तास कोंडले.

तिसगाव : चौदाव्या वित्त आयोगाचा भरपूर निधी असूनही खर्च करण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ मांडवे (ता. पाथर्डी) येथील संतप्त ग्रामस्थांनी शुक्रवारी ग्रामसेवक, उपसरपंच व सदस्यांना कार्यालयात चार तास कोंडले.   ग्रामसभा घेऊन निर्णय घेऊ असे ठरल्यानंतर ग्रामसेवक भगवान खेडकर, उपसरपंच बाळासाहेब लवांडे, ग्रा.पं.सदस्य राजू लवांडे, सदस्या सिंधूबाई लवांडे यांचे पती संभाजी लवांडे, रमेश बर्डे, विठ्ठल निर्मळ आदी स्थानबद्ध झालेल्यांची सायंकाळी उशिरा ग्रामस्थांनी सुटका करण्यात आली.  तिसगाव येथील वृद्धा नदीला सध्या भरपूर पाणी आहे. त्यामुळे दळणवळण ठप्प झाले आहे. मांडवे गावाच्या पश्चिम भागातील सुमारे एक हजार रहिवाशांचा संपर्क  तुटला आहे. नदीत चार फूट पाणी असल्याने पायी चालणेही मुश्कील झाले आहे. शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे, अशा तक्रारी आहेत. चौदाव्या आयोगाचा तीन वर्षापासून निधी अखर्चित आहे. त्यातून येथे तात्पुरत्या स्वरुपात नळ्या टाकून भराव करून पूल करावा, अशी सार्वत्रिक मागणी आहे. या मागणीला सदस्यांची अनुमती आहे. परंतु हे काम आराखड्यात नसल्याचे ग्रामसेवक भगवान खेडकर  सांगून वेळकाढूपणा करतात, असे संभाजी लवांडे, विठ्ठल निर्मळ यांनी सांगितले. याबाबत पंचायत समिती स्थरावर ही तक्रारी करण्यात आल्या.  पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील मांडवेबरोबर जोहरवाडी, मोहोज, शिंदेवस्ती, नजनवस्ती, पिसेवस्ती, चौधरवस्तीवरील नागरिकांना या अडचणींचा त्रास होत आहे. आराखड्यात पुलाचे काम नसले तरीही ग्रामसभेने एकमुखी मागणी केल्यास तशी नव्याने नोंद करता येते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. चंद्रकांत मतकर, शिवाजी लवांडे, संभाजी लवांडे, विठ्ठल निर्मळ, राजेंद्र लवांडे, श्याम कुलकर्णी, बाबासाहेब क्षीरसागर, रामभाऊ दातीर यांनी आंदोलनात भाग घेतला.