टाकळीभान टेलटँक हा पंचक्रोशीतील १० गावांसाठी वरदान आहे. जलसंपदा विभागाने पाणी वापराचे नियोजन केल्यामुळे यंदा टेलटँक १५ जुलैला तांत्रिकदृष्ट्या भरला आहे. गेल्यावर्षी तो १५ ऑगस्टला भरला गेला होता.
या टेलटँकमुळे पाणीपुरवठा योजनांचाही पाणीपुरवठा सुरळीत होत आसल्याने आठ ते दहा गावांतील पाणीटंचाईचे सावट दूर होण्यास मदत झाली आहे. टाकळीभान टेलटँक भरण्याचे स्रोत असलेली भंडारदरा व नीळवंडे ही दोन्ही धरणे अद्याप मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. भंडारदरा धरणाची पाणीपातळी ४ हजार ६४० दलघफू आहे, तर नीळवंडे धरणाची पाणीपातळी १ हजार १४० दलघफू आहे. टाकळीभान टेलटँक १५ जुलै रोजीच पूर्ण क्षमतेने भरल्याने रब्बी हंगामही व्यवस्थित पार पडणार असल्याने परिसरातील बळीराजा सुखावला आहे.
१६ टाकळीभान