शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी उद्योग मोडीत घालण्याचा घाट - रंजन दाणी यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 18:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क राळेगणसिद्धी : १९६२ च्या युद्धात खासगी तेल कंपन्या भाव दुप्पट करून अडचणीत सापडलेल्या देशाची कोंडी करू ...

ठळक मुद्दे राळेगणसिध्दीत भारत संचारची राज्यस्तरीय बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगणसिद्धी : १९६२ च्या युद्धात खासगी तेल कंपन्या भाव दुप्पट करून अडचणीत सापडलेल्या देशाची कोंडी करू पहात होत्या. म्हणून त्या कंपन्यांचे सरकारीकरण झाले. पंडित नेहरू सरकारी उद्योगांना मंदिरे म्हणत असत. ही आधुनिक भारताची मंदिरे सध्याच्या सरकारने उध्वस्त करायला घेतलीय की काय? असा सवाल एनएफटीइ संघटनेचे परिमंडल सचिव कॉ. रंजन दाणी यांनी केला.नॅशनल फेडरेशन आॅफ टेलिकॉम एम्लॉईज संघटनेच्या महाराष्ट्र परिमंडल कार्यकारिणीची राज्यस्तरीय बैठक रविवारी राळेगण सिद्धी येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर कॉ. हरीष मोक्ताली, औरंगाबादचे मु्ख्यव्यवस्थापक अरविंद वडनेरकर, व्यवस्थापक अमन जायस्वाल होते. अध्यक्षस्थानी कॉ. विजय बांडी होते.दाणी म्हणाले, सर्वाधिक पगार आणि सर्वाधिक पेन्शन घेणारा कर्मचारी बीएसएनएलचा आहे आणि हे कॉ. ओ.पी. गुप्ता या कर्मयोग्याचे देणे आहे. गेल्या दोन वर्षांचा बोनस मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ. चंदेश्वर सिंग यांनी फायद्याचे कलम वगळण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आणि त्यांच्या कार्यालयाने त्याची दखल घेतली. पुढील महिन्यात अमृतसर येथे संघटनेचे राष्ट्रिय अधिवेशन असून त्यासाठी पूर्ण क्षमतेने महाराष्ट्र सामिल व्हावा, असे आवाहन त्यांनी केले. अमन जायस्वाल म्हणाले, औद्योगिक कलह आणि शांती विशद करताना सर्वांनीच आधी संवाद करावा आणि मगच कायदा पाहावा. कुणाही कर्मचा-याची अन्यायकारक बदली होऊ नये. तसा अन्याय होत असेल तर प्रशासन पीडिताच्या पाठीशी असेल. अरविंद वडनेरकर यांनी तिसरा वेतन करार हा मुद्दा नसून चौथा किंवा पाचवा वेतन करार हा मुद्दा आहे असल्याचे सांगील्यावर टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. फोरजी साठी बीएसएनएल प्रयत्न करत असल्याचे सांगून या नंतर टेलीकॉम सेक्टरमध्ये केवळ चार आॅपरेटर राहतील, असा दावा त्यांनी केला.बैठकीस सरपंच रोहिणी गाजरे, कॉ. विजय पिंपरकर, कॉ. प्रदीप जाधव, कॉ. विजय शिपनकर, कॉ. सुनिता पाटील, कॉ. रमेश शिंदे, कॉ. सुनिल धर्माधिकारी, कॉ. शिरीष अकोलकर, कॉ. भाऊ खाकाळ, कॉ. व्हि.एस हंपे, कॉ. अशोक पिल्ले, कॉ. गोरख अकोलकर, रोहिदास पठारे उपस्थित होते. सूत्रसंचालन कॉ. अशोक हिंगे यांनी केले. काँ. त्रिंबक दुधाडे यांनी आभार मानले.

 

  • अस्तित्वाची चिंता नको
  • भारत संचारचा मार्केट शेअर पंधरा ते वीस टक्के राहिला तरी बावीस हजार कोटीचा व्यवसाय होईल एवढी प्रचंड क्षमता आपल्यात असल्याने कंपनीच्या अस्तित्वाची चिंता करु नका, परंतु त्यासाठी आपणाला सातत्यपुर्ण प्रयत्न करावे लागतील, असा सल्ला अरविंद वडनेरकर यांनी दिला.
टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेरBSNLबीएसएनएल