शेवगाव : सध्या युरिया खताचा प्रचंड तुटवडा आहे. शासनाने युरिया खताचा बफर स्टॉक खुला करावा व शेतकऱ्यांना हवी ती खते मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्यावतीने करण्यात आली आहे.
भाकपचे राज्य सहसचिव ॲड. सुभाष लांडे, संजय नांगरे, किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष बापूराव राशिनकर आदींच्या नेतृत्वाखाली या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार रमेश काथवटे यांना शुक्रवारी देण्यात आले.
सध्या शेतकरी वर्गाची खरीप हंगाम व इतर पिकांच्या मशागतीची धावपळ सुरू आहे. खते व बियाणांसाठी शेतकऱ्यांना रांगेत उभे राहूनही पाहिजे ती खते मिळत नाहीत. युरिया खताचा प्रचंड तुटवडा असून त्याबरोबर इतर खते घेण्याची सक्ती केली जात असून, हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. शेतकऱ्यांना हवी ती खते, बियाणे सवलतीच्या दरात मिळाली पाहिजेत. तत्काळ युरिया खताचा बफर स्टॉक शेतकऱ्यांना खुला करून देण्यात यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.
यावेळी आत्माराम देवढे, कारभारी वीर, भानुदास पालवे, नंदू नजन, विनोद मगर, शेतकरी उपस्थित होते.
180621\img-20210618-wa0067.jpg
फोटो शेवगावः युरिया खताचा बफर स्टॉक खुला करावा व शेतक-यांना मुबलक खते उपलब्ध करून द्यावीत या मागणीचे निवेदन नायब तहसिलदार यांना देताना भाकपचे राज्यसहसचिव अॅड. सुभाष लांडे, संजय नांगरे, बापूराव राशिनकर व शेतकरी.