शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सरकार साहित्यिकांचा गळा दाबत नाही - डॉ. गिरीष प्रभुणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 12:05 IST

साहित्यिकांनी राष्ट्रभान अन् समाजभान जपत लेखन केले पाहिजे. विघातक लेखन कुणीही करु नये. सद्यस्थितीत लेखक अन् प्रकाशकांवर सरकाचे कसल्याही प्रकारचे बंधन नाही. लेखकाला स्वातंत्र्य असल्यानेच वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्याची निर्मिती होत आहे.

अहमदनगर : साहित्यिकांनी राष्ट्रभान अन् समाजभान जपत लेखन केले पाहिजे. विघातक लेखन कुणीही करु नये. सद्यस्थितीत लेखक अन् प्रकाशकांवर सरकाचे कसल्याही प्रकारचे बंधन नाही. लेखकाला स्वातंत्र्य असल्यानेच वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्याची निर्मिती होत आहे. त्यामुळे साहित्यिकांचा कोणीही गळा दाबत नाही, असे १८ व्या समरसता साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉ. गिरीष प्रभुणे यांनी सांगितले.संमेलनासाठी नगरमध्ये आल्यानंतर डॉ़ प्रभुणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ ते म्हणाले, साहित्य क्षेत्रात सरकाराची भुमिका मर्यादित असावी. मार्गदर्शक आणि अर्थसहाय्य सरकारने केले पाहिजे. ही जबाबदारी सरकार सक्षमपणे पार पडत आहे. पुस्तके छापण्यावर सरकारचे बंधन नाही. पुर्वीपेक्षा आजची परिस्थिती बदलली आहे. आज कोणीही लिहू शकतो. काय लिहावे यावरही बंधन नाही. मात्र साहित्यिकांनी आपल्या मातीशी असलेली नाळ तोडू नये. विघातक प्रकारचे लेखन करु नये. आपल्या मातीचे ऋण साहित्यातून व्यक्त केले पाहिजे. राष्ट्रीयता जपली पाहिजे. जगभरात रक्तरंजिक क्रांती झाल्या़ मात्र भारतात आपोआप बदल होत गेला. त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत आपला देश प्रगल्भ आहे. भारतीय संस्कृतीत सामाजिक समरसतेचे मूल्य आहे. त्यामुळे भारतीय साहित्याचा विकास झाला आहे. दुर्लक्षित घटकांतील साहित्यिक उदयास आले आहेत. समरसता मुल्यांचा विकास साहित्य क्षेत्र बंधनमुक्त असल्याने झाला आहे. गुलामगिरीत कोणत्याही प्रकारचा विकास होत नाही. त्यामुळे सरकार साहित्यिकांचा गळा दाबत आहे, असा आरोप करणे चुकीचे आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरliteratureसाहित्य