शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

सरकारने फसवी कर्जमाफी केली : अरुण जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 12:33 IST

शेतकऱ्यांना फक्त शरद पवार हेच न्याय देऊ शकतात़ ते कृषिमंत्री असताना ७२ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती़

जामखेड : शेतकऱ्यांना फक्त शरद पवार हेच न्याय देऊ शकतात़ ते कृषिमंत्री असताना ७२ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती़ मात्र, आताच्या सरकारने फसवी कर्जमाफी केली़ ज्यांना शेतीचा गंधही कळत नाही ते सरकार सत्तेत बसले आहेत. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न काय समजणार, असा प्रश्न आमदार अरुण जगताप यांनी केला़लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ सोमवारी (दि़ १५) विधान परिषदेचे आमदार अरूण जगताप यांनी जामखेड तालुक्यातील डोणगाव, आरणगाव, पाटोदा या ठिकाणी सभा घेतल्या़ त्यानंतर जामखेड येथे शहरातील विविध भागातून रॅली काढण्यात आली़ रॅलीनंतर जामखेड येथील महावीर भवन येथे सभा झाली़ या सभेत जगताप बोलत होते. यावेळी मधुकर राळेभात, राजेंद्र कोठारी, दत्तात्रेय वारे, शहाजी राळेभात, डॉ. कैलास हजारे, अमजद पठाण, विजय गोलेकर, सुनील लोंढे, राजेंद्र चोपडा, सुमतिलाल कोठारी, अमित जाधव, दिगंबर चव्हाण, उमर कुरेशी, अमोल गिरमे, शेरखान पठाण आदी उपस्थित होते.उपमहाराष्ट्र केसरी काशिद म्हणाले, शेतकºयांचा छळ करणारे सरकार खाली खेचण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे़ अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत. अशा परिस्थितीत हे सरकार घालवले पाहिजे़ जगताप कुटुंबीय सर्वांच्या मदतीला धावणारे आहे़ त्याचा निश्चितच फायदा होईल़ सर्वांनी प्रामाणिकपणे कामाला लागावे, असे आवाहन काशिद यांनी केले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar-pcअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019