शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

गुड न्यूज- अहमदनगर शहराला स्वच्छतेचा थ्री स्टार, आरोग्यासाठी २५ कोटीपर्यंत निधी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 10:09 IST

अहमदनगर- केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानांतर्गत कचरा मुक्त शहराच्या स्पर्धेत अहमदनगर शहराला थ्री स्टार मानांकन मिळाले आहे. महापालिकेने केलेल्या अथक परिश्रमाला अखेर यश मिळाले आहे. या मानांकनामुळे शहराच्या विकासाला १५ ते २५ कोटी रुपयांचा भरीव निधी प्राप्त होणार आहे.

गुड न्यूज- अहमदनगर शहराला स्वच्छतेचा थ्री स्टार, आरोग्यासाठी २५ कोटीपर्यंत निधी मिळणारअहमदनगर- केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानांतर्गत कचरा मुक्त शहराच्या स्पर्धेत अहमदनगर शहराला थ्री स्टार मानांकन मिळाले आहे. महापालिकेने केलेल्या अथक परिश्रमाला अखेर यश मिळाले आहे. या मानांकनामुळे शहराच्या विकासाला १५ ते २५ कोटी रुपयांचा भरीव निधी प्राप्त होणार आहे.

अहमदनगर शहराला स्वच्छतेचा थ्री स्टार मिळाल्याची गोड बातमी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज सकाळीच दूरध्वनी करून महापौर बाबासाहेब वाकळे यांना दिली. तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनाही द्विवेदी यांनी दुरध्वनी करून अभिनंदन केले.

गेल्या सहा महिन्यांपूर्वी अहमदनगर शहरात केंद्र सरकारच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत नगर शहरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छ सर्वेक्षण राबविण्यात आले होते. त्या अंतर्गत स्वच्छता, आरोग्य, कचरामुक्त शहरासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या होत्या. तसेच घंटागाड्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन कचरा संकलित केला होता. शहरातील कचरा कुंड्याही हटविण्यात आल्या होत्या. वासुदेव आलाच्या धर्तीवर दारोदारी घंटाघाडी फिरली. शहरातील रस्त्यावर पडणारा कचराही हटविण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या मोहिमेला गती दिली. महापौर बाबासाहेब वाकळे यांनी शहर स्वच्छ करण्यासाठी परिश्रम घेतले. शहर स्वच्छ व्हावे,यासाठी ते स्वत: मैदानात उतरले. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे आरोग्याधिकारी डॉ. एन.एस. पैठणकर, स्वच्छता निरीक्षक, नगरसेवक आणि स्वच्छता कर्मचारी यांनी मोठे योगदान दिले. नागरिकांनीही महापालिकेच्या प्रयत्नांना साथ दिली. त्याम्ुळे शहर स्वच्छ झाले आणि थ्री स्टार मिळाला.

-----------------------प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न आणि स्वच्छता, आरोग्य यासाठी मनापासून काम केले. त्यासाठी सर्वांनी योगदान दिले. जागृती केली. त्यामुळे अहमदनगरला स्वच्छतेचा थ्री स्टार मिळाला. यामुळे शहराच्या विकासाला १५ ते २५ कोटी रुपयांचा भरीव निधी मिळणार आहे. हा निधी शहराचे आरोग्य सुधारण्यासाठी, तसेच शहर कचरामुक्त करण्यासाठी उपयोगात आणू. सर्वांचे आरोग्य चांगले राहिले तर मन चांगले राहील. मन चांगले असेल तर सर्व प्रगती करू शकतील. त्यामुळे शहर आरोग्यदायी नक्कीच होईल. थ्री स्टार पुरस्कार मिळाल्यामुळे कष्टाचे चीज झाले आहे, याचा निश्चितच आनंद वाटतो आहे.-बाबासाहेब वाकळे, महापौर 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरGovernmentसरकार