शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

लोणीव्यंकनाथ येथे गुड मॉर्निंग पथकाच्या कॅमे-यात २१ लोटाबहाद्दर कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 11:17 IST

श्रीगोंदा : गुड मॉर्निंग पथकाने शुक्रवारी (दि़ ५) भल्या पहाटे लोणीव्यंकनाथ येथे उघड्यावर प्रात:विधी करणा-यांविरोधात कारवाईची मोहिम राबविली़ पथकाचा ...

श्रीगोंदा : गुड मॉर्निंग पथकाने शुक्रवारी (दि़ ५) भल्या पहाटे लोणीव्यंकनाथ येथे उघड्यावर प्रात:विधी करणा-यांविरोधात कारवाईची मोहिम राबविली़ पथकाचा कॅमेरा सुरु होताच उघड्यावर प्रात:विधी करणा-यांची एकच धांदल उडाली़ गुड मॉर्निंग पथकाच्या कॅमे-यात कैद झालेल्या २१ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली़श्रीगोंदा पंचायत समितीतील विस्तार अधिकारी अण्णासाहेब गहिरे, सागर कुरे, राजू दराडे, गोरक्ष गायकवाड, प्रतिभा डोमे, माधवी खंडागळे, रामभाऊ खामकर, बाळासाहेब डोईफोडे यांच्या पथकाने माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब नाहाटा यांच्या गावावर ‘फोकस’ करीत उघड्यावर प्रात:विधी करणा-यांवर कॅमे-यातून फ्लॅश टाकला आणि एकच धावपळ उडाली. गुड मॉर्निंग पथकाच्या कॅमे-यात २१ जण कैद झाले तर काहीजण पळून गेले, अशी पथकाने ‘लोकमत’ला दिली़ नजीर आतार, शिवाजी खंडागळे, दत्तात्रय मासाळ, इंदू ससाणे, सुरेश धाडगे, व्यंकनाथ मांडे, सुभाष मदने, अनिल आल्हाट, सुरेश कांबळे, लक्ष्मी गोरखे, बापू गोरखे, सुवर्णा ससाणे, श्रीरंग देवकुळे, नितीन जावळे, कैलास शिंदे, सतिश साळवे, राजू जौजाळ, बबन वागस्कर, अनिल जावळे, विजय मिसाळ यांच्या विरोधात कारवाई केली आहे.

बड्या नेत्यांच्या गावांचा अडसर

श्रीगोंदा तालुका हागणदारीमुक्तीच्या उंबरठ्यावर आहे़ २६ जानेवारी २०१८ पर्यंत श्रीगोंदा तालुका हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरु आहे. पण बड्या नेत्यांची गावे असलेली काष्टी, बेलवंडी, हंगेवाडी, आढळगाव, लोणीव्यंकनाथ, भानगाव, कोळगाव, अजनुज ही गावे अडसर ठरली आहेत़ त्यामुळे या गावांकडे गुड मॉर्निंग पथकाने ‘फोकस’ केला आहे. या गावांमध्ये आता रामप्रहरी गुड मॉर्निंग पथकाने सलामी देण्याचा निर्णय घेतला आहे.श्रीगोंदा तालुका ८६% हागणदारी मुक्त

श्रीगोंदा तालुका ८६% हागणदारी मुक्त झाला आहे़ दुष्काळी भागातील गावांमध्ये हागणदारीमुक्तीचे चांगले काम झाले आहे़ पण बागायती भागातील गावांनी या अभियानाकडे कानाडोळा केला आहे. त्यामुळे भविष्यात या गावांना विकास योजना राबविताना हागणदारीचा फटका बसण्याची शक्यता आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा