शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

साधू, संत, कारसेवकांच्या बलिदानामुळेच शिलान्यासाचा सुवर्णयोग- भास्करगिरी महाराज, देवगड येथून अयोध्येकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 13:06 IST

नेवासा : अयोध्येत ५ आॅगस्ट रोजी राम मंदिराच्या शिलान्यास व भूमिपूजन सोहळा होत आहे. यासाठी नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथील श्री गुरुदेव दत्त पिठाचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज हे सोमवारी (३ आॅगस्ट) सकाळी ९.३० च्या सुमारास अयोध्येकडे रवाना झाले. साधू, संत व कार सेवकांच्या बलिदानामुळेच अयोध्येत शिलान्यास व भूमिपूजन करण्याचा सुवर्णयोग आला असल्याची भावना भास्करगिरी महाराजांनी निघण्यापूर्वी बोलून दाखवली.

नेवासा : अयोध्येत ५ आॅगस्ट रोजी राम मंदिराच्या शिलान्यास व भूमिपूजन सोहळा होत आहे. यासाठी नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथील श्री गुरुदेव दत्त पिठाचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज हे सोमवारी (३ आॅगस्ट) सकाळी ९.३० च्या सुमारास अयोध्येकडे रवाना झाले. साधू, संत व कार सेवकांच्या बलिदानामुळेच अयोध्येत शिलान्यास व भूमिपूजन करण्याचा सुवर्णयोग आला असल्याची भावना भास्करगिरी महाराजांनी निघण्यापूर्वी बोलून दाखवली.

आज तब्बल ५०० वर्षानंतर रामाचे मंदिर निर्माणाचे स्वप्न पूर्ण होत आहे. संपूर्ण देशवाशीयांची भावना यानिमित्ताने पूर्ण झाली आहे. यासाठी अनेक संत, महंत, रामभक्त कारसेवक यांनी अपार कष्ट घेतले आहेत. महाराष्ट्रातील संप्रदायाच्या वतीने आम्हाला ही संधी प्राप्त झाली आहे. आपण दिलेल्या श्रद्धेच्या भावनांचे गाठोडे घेऊन आम्ही अयोध्येला जात आहोत. मंदिराची उभारणी सामंजस्य व मानवतेची उभारणी आहे. त्यांना इतर जाती, धर्मात गुंफवू नका असे आवाहन त्यांनी केले. ५ आॅगस्ट रोजी सर्वांनी मठ मंदिरात व घरासमोर रांगोळया काढून सडामार्जन करावे. प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेचे पूजन करावे. दुपारी १२ वाजता आरती करुन प्रसाद वाटावा. यावेळेस आपण सर्व जण अयोध्येला आहोत, अशी भावना मनाशी बाळगून हा आनंद साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले....खारीचा वाटा म्हणून पूजा करणारप्रभू रामचंद्रांचे अयोध्येतील मंदिर हे जगात आदर्श ठरावे, असा प्रयत्न न्यास समितीचा आहे. अयोध्येला निघण्यापूर्वी गुरुवर्य भास्करगिरी महाराजांनी श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांच्या समाधीसह भगवान दत्तात्रयांचे दर्शन घेतले. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानच्या वतीने शिवाजी महाराज देशमुख यांच्या हस्ते संत पूजन करून भास्करगिरी महाराजांचा सत्कार करण्यात आला. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRam Mandirराम मंदिर