शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

दीड तोळ्याची सोन्याची चैन ग्राहकाला परत केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 16:16 IST

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या तळेगाव दिघे शाखेतील कर्मचारी

तळेगाव दिघे : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या तळेगाव दिघे शाखेतील कर्मचारी सतीष नामदेव पोकळे यांच्या प्रामाणिकपणामुळे एका ग्राहकाची विसरलेली दीड तोळे किंमतीची सोन्याची चैन परत करण्यात आली. त्याबद्दल ग्राहकांतर्फे प्रामाणिकपणाबद्दल बँक कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या तळेगाव दिघे येथील शाखेचे वडझरी खुर्द येथील खातेदार नानासाहेब सोपान सुपेकर हे गुरुवारी बँकेत त्यांचे लॉकर आॅपरेट करण्यासाठी आले होते. सुपेकर हे त्यांचे लॉकर आॅपरेट करीत असताना त्यांच्याकडून सोन्याची चैन बाजूला तशीच पडून राहिली. बँकेचे कर्मचारी पोकळे हे लॉकरची खातरजमा करीत असताना त्यांना बाहेर असलेली चैन सापडली. ही चैन सुपेकर यांची असल्याची खात्री झाल्यानंतर बँकेचे शाखा व्यवस्थापक रमेश पवार यांनी सापडलेली चैन सुरक्षित असल्याबाबत ग्राहकास कल्पना दिली. दीड तोळ्याची चैन सुरक्षित असून ती परत मिळणार असल्याच्या बातमीने सुपेकर यांना दिलासा मिळाला. ग्राहक सुपेकर यांनी शनिवारी बँकेत येऊन प्रामाणिकपणाबद्दल कर्मचारी पोकळे, व्यवस्थापक पवार व अन्य कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.पोकळे यांच्या प्रामाणिकपणाबद्दल बँकेचे अध्यक्ष अमित पंडित, उपाध्यक्ष दत्तात्रय खुळे, मुख्य व्यवस्थापक लक्ष्मण वाघ, संचालक किसनराव सुपेकर व तळेगाव दिघे येथील ग्रामस्थांनी कौतुक केले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर