शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आठ लाखांच्या सोन्यावर डल्ला मारणारे दोन दिवसांत गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 12:21 IST

शहरातील डॉ. प्रविण क्षिरसागर यांच्या घराचे कुलूप तोडून सुमारे ८ लाख रुपयांच्या सोन्यावर डल्ला मारणा-या चार चोरट्यांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अवघ्या २ दिवसात गजाआड केले. तर एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला.

राहुरी : शहरातील डॉ. प्रविण क्षिरसागर यांच्या घराचे कुलूप तोडून सुमारे ८ लाख रुपयांच्या सोन्यावर डल्ला मारणा-या चार चोरट्यांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अवघ्या २ दिवसात गजाआड केले. तर एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला.७ आॅगस्ट २०१८ रोजी दुपारी दीड ते तीन वाजण्याच्या दरम्यान राहुरी शहरातील शेटे इस्टेट परिसरातील यशवंत कॉम्प्लेक्समधील डॉ. प्रविण राधाजी क्षिरसागर यांच्या घरात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश केला होता. घरात उचकापाचक करुन कपाटातील ७ लाख ८० हजार रुपये किंमतीचे सुमारे ३० ते ३५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले होते. त्यानंतर राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान परिसरातील एका सीसीटीव्हीमध्ये चोरटे दिसून आले. त्यानुसार शिळीमकर यांनी तपासाची चक्रे फिरवली होती. दरम्यान पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्यासह सहाय्यक फौजदार सोन्याबापू नाणेकर, हवालदार विष्णू घोडेचोर, रवींद्र कर्डीले, सचिन मिरपगार, मनोज गोसावी, राजकुमार मेठेकर, विजय ठोंबरे, योगेश गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, देवा काळे, संभाजी कोतकर, दिपक शिंदे, रवी सोनटक्के यांच्या पथकाने दिनांक ९ आॅगस्ट रोजी पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान शनी शिंगणापूर फाटा येथे सापळा लावला. यावेळी हुंदाई कंपनीची यु.पी.- १६, ए.के.- ३८३९ नंबरच्या चारचाकीमधून चोरटे जात होते. यावेळी इरफान इर्शद कुरेशी (वय ३८ वर्षे), इनाम मेहमूद कुरेशी (वय ३६ वर्षे, जि. हाकुड) आणि अस्लीम वसुरुद्दीन मरिक (वय ३५ वर्षे), इर्शाद अब्दूल रहिम झोजा (वय ४५, दोघे जि- सिकंदराबाद) या चार जणांच्या मुसक्या आवळून ताब्यात घेतले. यावेळी तर नदिम ऊर्फ बंटी कुरेशी हा पळून जाण्यात यशस्वी झाला. या घटनेतील सर्व आरोपी उत्तर प्रदेशमधील असून त्यांच्या ताब्यातून चारचाकी वाहनासह मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी