शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर जिल्ह्याला ५० लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 20:44 IST

जिल्ह्यात वृक्षलागवड मोहिमेंतर्गत ५० लाख झाडे लावली जाणार असून, ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी त्यांना देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी बैठकीत दिल्या.

ठळक मुद्देअहमदनगर जिल्ह्यात वृक्षलागवड मोहिमेंतर्गत ५० लाख झाडे लावली जाणारयासाठी जिल्ह्यात ५९ लाख ४० हजार पेक्षा अधिक रोपे तयार असल्याची माहिती रेड्डी यांनी दिली. यामध्ये कडूलिंब, सिसम, करंज, आवळा, चिंच, वड यासह आठ ते दहा प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.पर्यावरण प्रेमींना हरित सेनेचे सदस्य होऊन या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. आतापर्यत जिल्ह्यात १ लाख ७६ हजार हरितसेनेचे आॅनलाईन सदस्य झाले आहेत.

अहमदनगर : जिल्ह्यात वृक्षलागवड मोहिमेंतर्गत ५० लाख झाडे लावली जाणार असून, ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी त्यांना देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी बैठकीत दिल्या.५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत यावर्षी राज्यात १३ कोटी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या अंतर्गत जिल्ह्याला ४९ लाख ९३ हजार ५१० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या कामाचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने, अहमदनगर विभागाचे उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, उपजिल्हाधिकारी वामन कदम, सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक अरुण येलजाळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.यंदाच्या उद्दिष्टापैकी ग्रामपंचायतींना १४ लाख ३० हजार, वन विभागास ३० लाख २० हजार, तसेच इतर यंत्रणेमार्फत ५ लाख ४३ हजार ५१० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यात ५९ लाख ४० हजार पेक्षा अधिक रोपे तयार असल्याची माहिती रेड्डी यांनी दिली. यामध्ये कडूलिंब, सिसम, करंज, आवळा, चिंच, वड यासह आठ ते दहा प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी नियोजन करावे. वृक्ष लागवडीसाठी लागणारे खड्डे मार्च अखेर पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी महाजन यांनी झालेल्या बैठकीत दिल्या. त्याचबरोबर जिल्ह्यात हरित सेनेची सभासद नोंदणी वाढण्यासाठी सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी नोंदणी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.जिल्ह्यात हरित सेना उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे उपवनसंरक्षक रेड्डी यांनी सांगितले. पर्यावरण प्रेमींना हरित सेनेचे सदस्य होऊन या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. आतापर्यत जिल्ह्यात १ लाख ७६ हजार हरितसेनेचे आॅनलाईन सदस्य झाले आहेत. ३१ मार्च २०१८ पर्यंत उर्वरित खड्डे खोदण्याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचेही रेड्डी यांनी सांगितले. मागील दोन्ही वर्षी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट जिल्ह्याने पूर्ण केलेले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय