शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘मुळा’चे पाणी पाथर्डी-शेवगावच्या पूर्व-दक्षिणेला द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 15:30 IST

मुळा धरणाचे पाणी पाथर्डी-शेवगाव तालुक्यातील पूर्व-दक्षिण भागाला मिळावे, अशी मागणी जलक्रांती जनआंदोलन संघटनेने केली आहे.

पाथर्डी : मुळा धरणाचे पाणी पाथर्डी-शेवगाव तालुक्यातील पूर्व-दक्षिण भागाला मिळावे, अशी मागणी जलक्रांती जनआंदोलन संघटनेने केली आहे. याबाबत संघटनेचे संयोजक दत्ता बडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी पाथर्डीचे तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन दिले.शेवगावच्या पूर्व व दक्षिण भागात पाऊस कमी पडत असल्यामुळे यापूर्वी हा महाराष्ट्रातील सर्वाधिक दुष्काळी भाग म्हणून परिचित होता. कायमस्वरुपी दुष्काळ निवारण करण्यासाठी मुळा धरणाचे पाटपाणी कासारपिंपळगाव व साकेगावपर्यंत आले. परंतु ते पुढे आले न आल्यामुळे हा भाग पाण्याअभावी दुष्काळीच राहिला. त्यामुळे पाथर्डी-शेवगाव मतदार संघाच्या लोकप्रतिनिधी म्हणून मोनिका राजळे यांनी या भागातील प्रत्येक गावात नवीन पाझर तलाव तयार करणे, असलेल्या पाझर तलावांची पुनर्बांधणी करून त्यांची साठवण क्षमता वाढवून त्यामध्ये मुळा धरणाचा पाट पुढे वाढवून शक्य तितक्या लवकर आवश्यक त्या ठिकाणी लिफ्ट उभारून पाईप चारीने पाणी सोडण्याची योजना तयार करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. तसेच येत्या बुधवारी यासाठी पाथर्डी तहसीलसमोर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.तहसीलदारांना निवेदना देताना संजय दौंड, बाबासाहेब वाघ,अनिल जवरे, बाजीराव कीर्तने, अमोल कराड, अवि बडे, शुभम बडे, सुदर्शन बडे , रामनाथ बडे, शैलेंद्र जायभाये आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर