शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
5
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
6
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
7
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
8
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
9
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
10
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
11
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
12
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
13
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
14
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
15
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
16
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
17
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
18
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
19
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
20
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत

कांद्याला दोन हजार रुपये भाव द्या

By admin | Updated: March 16, 2016 08:29 IST

अहमदनगर : कांद्याचे भाव गडगडले आहेत़ त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून, कांद्याला किमान दोन हजार रुपये भाव देण्यात यावा,

अशोक पाटील --इस्लामपूर मतदारसंघातील विद्यमान आमदार जयंत पाटील यांचे नेतृत्व आजही अबाधित आहे. येथून पुढेही ते अबाधित राहणार, राहील यात शंका नाही. त्यांच्याविरोधात असणारे सर्वच विरोधी नेते सत्तेच्या मृगजळामागे धावतात. पण त्यांना त्यात यश मिळत नाही. यामागे विरोधकांमध्ये असलेले अंतर्गत मतभेद आणि एकाच कुटुंबात वेगवेगळी राजकीय मते असल्याची चर्चा दबक्या आवाजात नेहमीच सुरु असते.वाळवा-शिराळ्यात राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार विलासराव शिंदे, ‘महानंदा’चे माजी अध्यक्ष विनायकराव पाटील, सांगली जि. म. बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील या घराण्यांकडे सत्ताकेंद्रे आहेत. राष्ट्रवादीतील सर्वच नेते आणि कार्यकर्ते जयंत पाटील यांचा शब्द प्रमाण मानतात. परंतु स्थानिक पातळीवरील राजकारणात अंतर्गत मतभेद आहेत.या भक्कम असलेल्या राष्ट्रवादीविरोधात स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक, भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रम पाटील, हुतात्मा संकुलनाचे नेते वैभव नायकवडी, नानासाहेब महाडिक, सी. बी. पाटील, माजी जि. प. सदस्य जितेंद्र पाटील, अभिजित पाटील, वैभव पवार हे नेते सक्रिय आहेत. परंतु ऐन निवडणुकीच्यावेळी त्यांच्याकडून वेगवेगळ्या भूमिका बजावल्या जातात. त्यांच्यामध्ये अंतर्गत राजकीय अडथळे तसेच विरोधकांचे संघटन कोणी करायचे, या वादामुळे त्यांची ताकद नेहमीच तोकडी पडत आली आहे.आमदार जयंत पाटील यांचे राजकीय वारसदार अद्यापही राजकारणात नाहीत. परंतु त्यांचे चिरंजीव प्रतीक पाटील मात्र सावधपणे राजकारणाबरोबर उद्योग समूहाचा आढावा घेताना दिसत आहेत. अलीकडील सहा महिन्यात त्यांनी उद्योग समूहातील बैठकांनाही हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.नानासाहेब महाडिक यांच्यापुढे सत्तास्थाने आहेत. परंतु त्यांचे आमदार होण्याचे स्वप्न अद्याप पूर्ण झालेले नाही. सध्या महाडिक कोणत्या पक्षात आहेत हे गुलदस्त्यात आहे. हुतात्मा संकुलनाची सर्व जबाबदारी वैभव नायकवडी यांनी आपल्या हाती घेतली आहे, तर त्यांचेच पुतणे सरपंच गौरव नायकवडी हे राजकारणात भरारी घेण्याच्या प्रयत्नात आहेत. परंतु त्यांनाही अंतर्गत अडथळे असल्याची चर्चा आहे.बोरगाव जि. प. मतदारसंघातील माजी जि. प. सदस्य जितेंद्र पाटील यांनी जयंत पाटील यांच्याविरोधात आमदार पदाची निवडणूक लढवली, परंतु त्यांना यश मिळाले नाही. काँग्रेसमधीलच काही नेते त्यांना विरोध करत आहेत. त्यामुळे अद्यापही ते जि. प. मतदारसंघाच्या बाहेर पडून कोणतीही निवडणूक जिंकू शकलेले नाहीत.इस्लामपूर पालिकेच्या निवडणुकीचे वेध लागले की, माजी जि. प. सदस्य राहुल महाडिक, जि. प. सदस्य सम्राट महाडिक, भाजयुमोचे विक्रम पाटील, बाबासाहेब सूर्यवंशी, वैभव पवार, शिवसेनेचे आनंदराव पवार हे एकत्र निवडणूक लढविण्याचा प्रयत्न करतात. परंतु ऐनवेळी त्यांच्यातच कुरघोड्या होत असल्याने याचा राष्ट्रवादीला फायदा होतो.शिराळा तालुक्यातही आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी राष्ट्रवादीची ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु गत विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांनी मानसिंगराव नाईक यांचा पराभव करुन या मतदारसंघावर भाजपचा झेंडा फडकवला आहे. मानसिंगराव नाईक आणि सत्यजित देशमुख हे वेगवेगळे लढल्यानेच शिवाजीराव नाईक यांना विजयश्री मिळाली. तरीही मतदार संघात भाजपची म्हणावी अशी ताकद दिसत नाही. आता पुन्हा मानसिंगराव नाईक आणि सत्यजित देशमुख एकत्रित येऊन शिवाजीराव नाईक यांच्याविरोधात मोट बांधत आहेत. आता आगामी राजकीय उलथापालथीकडे लक्ष लागले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मतभिन्नता इस्लामपूर पालिकेच्या निवडणुकीचे वेध लागले की, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल महाडिक, जिल्हा परिषद सदस्य सम्राट महाडिक, भारतीय युवा मोर्चाचे विक्रम पाटील, बाबासाहेब सूर्यवंशी, वैभव पवार, शिवसेनेचे आनंदराव पवार हे एकत्र निवडणूक लढविण्याचा प्रयत्न करतात. परंतु ऐनवेळी त्यांच्यातच कुरघोड्या होत असल्याने याचा राष्ट्रवादीला फायदा होतो. जयंत पाटील यांच्याविरोधात नेहमी ऐनवेळी एकमत होताना दिसत नाही.