शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

‘पंतप्रधान आवास’साठी शासकीय जमीन द्या : घरकुल वंचितांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 11:35 IST

घरकुल वंचितांसाठी पंतप्रधान आवास योजना राबविण्यासाठी नगर शहराजवळील नेप्ती ग्रामपंचायत हद्दीतील कांदा मार्केटलगत असलेली शासकीय पड जमीन मिळण्याची मागणी ‘मेरे देश मे मेरा अपना घर’ आंदोलनाच्या वतीने करण्यात आली.

अहमदनगर : घरकुल वंचितांसाठी पंतप्रधान आवास योजना राबविण्यासाठी नगर शहराजवळील नेप्ती ग्रामपंचायत हद्दीतील कांदा मार्केटलगत असलेली शासकीय पड जमीन मिळण्याची मागणी ‘मेरे देश मे मेरा अपना घर’ आंदोलनाच्या वतीने करण्यात आली.हुतात्मा स्मारक येथे झालेल्या बैठकीत घरकुल वंचितांनी घरकुल होण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच पंतप्रधान आवास योजनेची घोषणा होऊन साडेतीन वर्षे उलटली तरी अद्याप वंचितांना घरे मिळाली नसल्याबाबत नाराजीही व्यक्त केली़ त्यामुळे पुढील निवडणुकीत सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिला.नेप्ती ग्रामपंचायत हद्दीत शासकीय २० ते २५ एकर खडकाळ जमीन पडीक आहे. या शासकीय जमिनीवर पंतप्रधान आवास योजनेचा प्रकल्प उभारून घरकुल वंचितांची घरे साकारली जाणार आहे. पंतप्रधान आवास जिल्हा समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे जिल्हाधिकारी यांच्याकडे असून, त्यांनी पुढाकार घेतल्यास ही योजना यशस्वी होणार आहे. मागे घरकुल वंचितांनी पंम्पिंग स्टेशन येथील शेतकी खात्याची पड जमीन मिळण्याची मागणी केली होती. मात्र त्याला कृषी विभागाच्या वतीने विरोध दर्शविण्यात आला. शासकीय पड जमिनीवर पंतप्रधान आवास योजना राबविण्याची भूमिका संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आली असून, यासाठी संघटनेच्या वतीने शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येणार आहे. या बैठकीप्रसंगी अ‍ॅड. गवळी, पास्टर अश्विन शेळके, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, अशोक भोसले, शारदा भालेकर, अंबिका नागुल, सुचिता शेळके, अंबिका जाधव, लता पाडले, फरिदा शेख, नंदा मोरे, शारद गायकवाड, शांता खुडे, कांता साळवे, सविता बोरुडे,  शारदा जंगम आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय