शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीसेविकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्या, आंदोलनाने जिल्हा परिषद दणाणले

By चंद्रकांत शेळके | Updated: July 25, 2023 19:09 IST

जिल्हा परिषदेच्या आवारात मंगळवारी सकाळीच शेकडोंच्या संख्येने अंगणवाडीसेविका जमल्या.

अहमदनगर : अंगणवाडीसेविका, मदतनीस यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, सेवानिवृत्तीनंतरची थकीत रक्कम तातडीने द्यावी यासह प्रकल्पाशी संबंधित विविध प्रश्नांबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचारी युनियनच्या वतीने मंगळवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या अंगणवाडी सेविकांच्या घोषणांनी जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून निघाला.

जिल्हा परिषदेच्या आवारात मंगळवारी सकाळीच शेकडोंच्या संख्येने अंगणवाडीसेविका जमल्या. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात संघटनेच्या अध्यक्षा कॉ. मदिना शेख, सरचिटणीस कॉ. राजेंद्र बावके, कॉ. जीवन सुरुडे आदी सहभागी झाले होते.

यावेळी प्रमुख वक्त्यांनी आपल्या भाषणात शासनाच्या वेळकाढूपणाचा निषेध नोंदवला. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत संबंधित खात्याचे मंत्री, सचिव, महिला व बालकल्याण विभाग यांच्या समवेत कृती समितीची चर्चा झालेली होती. त्यात मंत्र्यांनी प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही त्याची पूर्तता झालेली नाही. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे दरमहा पेन्शन, ग्रॅच्युईटी, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, सेवानिवृत्तीनंतर थकीत एकरकमी लाभ तातडीने देण्यासह प्रकल्पाशी संबंधित विविध प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद महिला बाल कल्याणचे जिल्हा प्रकल्प अधिकारी मनोज ससे यांना देण्यात आले.या आहेत मागण्यादरमहा अर्ध्या मानधनाएवढी पेन्शन मिळावी.ग्रॅच्युईटी मिळावी.सेवानिवृत्तीचे लाभ मिळावेत.अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन द्यावेत.टीएडीएची थकीत रक्कम मिळावी.दरमहा पाच तारखेच्या आत मानधन मिळावे.सादिलच्या रकमेत वाढ करावी.अंगणवाडी केंद्रांना भाडेवाढ करावी.विमा योजनेचा लाभ देणे.सेविकांच्या पर्यवेक्षिका पदावर बढती मिळावी.