शेवगाव : राज्य शिक्षण आणि संशोधन परिषद, पुणे आयोजित ‘राज्यस्तर नवोपक्रम स्पर्धा २०२०’ या स्पर्धेत येथील बाळासाहेब भारदे हायस्कूलमधील उपक्रमशील शिक्षक उमेश घेवरीकर यांनी सादर केलेल्या ‘शिक्षण प्रक्रियेत कम्युनिटी रेडिओचा प्रभावी वापर’ या नवोपक्रमाला जिल्हास्तरावरील प्रथम क्रमांक मिळाला आहे.
कोरोना संकट काळात घेवरीकर यांनी मोबाईलवर इयत्ता ८ वी ते १० वीच्या गणित व विज्ञान विषयाचे रंजक आणि संवादी पाठ ध्वनिमुद्रित करून त्यांचे नगर व औरंगाबाद येथील कम्युनिटी रेडिओ केंद्रावरून मार्च ते जून या काळात दर रविवारी प्रसारण केले. या उपक्रमातून गोरगरीब व वंचित घटकातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण सहज सोप्या पद्धतीने कोरोना संकट काळातही पोहोचवता आले. मागील वर्षीदेखील त्यांचा उपक्रम जिल्ह्यात प्रथम आला होता.
व्ही-स्कूलने शिक्षक व पालकांसाठी आयोजित केलेल्या राज्यस्तर निबंध स्पर्धेत घेवरीकर यांनी पाठवलेल्या ‘माझा ऑनलाईन शिक्षणाचा अनुभव’ या निबंधाला राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळाला.