शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

अंगठा टेकवा, धान्य मिळवा

By admin | Updated: July 1, 2017 18:51 IST

तुम्हाला धान्य मिळविण्यासाठी अंगठा मारावाच लागणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : तुम्हाला वाचता येतेय़़ चांगली सहीही करता येतेय़़़ तुम्ही अडाणी नाहीत़़ तरीही आता तुम्हाला धान्य मिळविण्यासाठी अंगठा मारावाच लागणार आहे़ हा अंगठा शाईत नव्हे तर पीओएस मशीनवर टेकवावा लागणार आहे़ तरच तुम्हाला तुमच्या हक्काचे रेशनचे धान्य मिळणार आहे़जिल्हा पुरवठा विभागाने स्वस्त धान्य वाटपासाठी आता बायोमेट्रिक प्रणाली लागू केली असून, जिल्ह्यात दोन हजार पीओएस (पॉइंट आॅफ सेल) मशिन दाखल झाले आहेत. आठवडाभरात दुकानदारांना प्रशिक्षण देऊन या मशिन स्वस्त धान्य दुकानांत कार्यान्वित होणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप निचित यांनी दिली. स्वस्त धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी, तसेच सर्व यंत्रणेवर प्रशासनाचे नियंत्रण राहण्यासाठी ही प्रणाली संपूर्ण राज्यात यापूर्वीच कार्यान्वित झाली आहे. नाशिक विभागात हे काम रखडले होते. दरम्यान, जिल्हा पुरवठा विभागाने दोन हजार मशिन जिल्ह्यासाठी मागवले आहेत. जिल्ह्यात एकूण १८३७ स्वस्त धान्य दुकाने आहेत. त्या सर्व दुकानदारांना हे मशिन कसे वापरावे, याचे प्रशिक्षण पुरवठा विभाग व ओयासीस कंपनीच्या प्रतिनिधींकडून येत्या आठवडाभरात टप्प्याटप्प्याने दिले जाणार आहे. आता स्वस्त धान्य मिळवण्यासाठी ग्राहकांना प्रथम त्यांचा अंगठा या मशिनवर टेकवून ओळख पटवावी लागणार आहे. त्यानंतर ग्राहकाला कोणते धान्य, किती व कोणत्या वेळेला दिले याची माहिती आॅनलाइन पुरवठा विभागाला समजेल. तसेच त्या धान्याचे बिल याच मशिनमधून बाहेर पडेल. ज्या ग्राहकांनी धान्य नेले नाही, त्यांचे धान्य आपोआप शिल्लक स्टॉकमध्ये दिसणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यात धान्य दुकानदाराला शिल्लक धान्य वजा करूनच नवीन धान्य दिले जाईल. शिवाय पुरवठा विभागालाही सर्वच दुकानदारांवर कार्यालयात बसल्याजागी नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. ही प्रणाली लागू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची माहिती संकलित करण्याचे काम पुरवठा विभागाने आधीच पूर्ण केले आहे. त्यात शिधापत्रिकांवर असलेली कुटुंबातील सदस्यांची माहिती, त्यांच्या हाताचे ठसे, शिधापत्रिकेचा प्रकार, किती धान्य मिळते, या माहितीचा समावेश आहे.      तालुकानिहाय स्वस्त धान्य दुकानांची संख्या      तालुका             एकूण दुकाने

  • नगर                 १२४
  • एफडीओ            ९१
  • पारनेर              ११८
  • श्रीगोंदा            १२४
  • कर्जत              १३५
  • जामखेड          १०३
  • पाथर्डी             १५२
  • शेवगाव           १२४
  • राहुरी              १०८
  • नेवासा            १५१
  • संगमनेर         १६३
  • अकोले           १३९
  • राहाता           ८१
  • कोपरगाव       ११३
  • श्रीरामपूर       १११

       ----------------------         एकूण          १८३७