शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खंडणीतूनच झाली गौतम हिरण यांची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:19 IST

श्रीरामपूर : संपूर्ण राज्यात गाजलेल्या बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण या व्यापाऱ्यांच्या अपहरण आणि हत्याकांडाचा छडा लावण्यात पोलिसांना अखेर ...

श्रीरामपूर : संपूर्ण राज्यात गाजलेल्या बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण या व्यापाऱ्यांच्या अपहरण आणि हत्याकांडाचा छडा लावण्यात पोलिसांना अखेर यश आले. याप्रकरणी पोलिसांनी सिन्नर (जि.नाशिक) येथून पाच आरोपींना अटक केली आहे. हिरण यांचे अपहरण खंडणीसाठी करण्यात आले होते असे तपासात निष्पन्न झाले.

अपहरण करण्यात आलेली कारही जप्त करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये संदीप मुरलीधर हांडे (वय २६, माळेगाव, ता.सिन्नर), जुनेद उर्फ जावेद बाबू शेख (वय २५, रा.सप्तशृंगीनगर, नायगाव रोड, सिन्नर) अजय राजू चव्हाण (वय २६, पास्तेगाव, मारुती मंदिरासमोर, सिन्नर), नवनाथ धोंडू निकम (वय २९, रा.उक्कडगाव, ता.कोपरगाव) व एक २२ वर्षीय आरोपी यांचा समावेश आहे.

आरोपींकडून हिरण यांचा मोबाइल फोन तसेच अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेली मारुती व्हॅन (एमएच १५,जीएल ४३८७) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी शनिवारी येथील शासकीय विश्रामगृह येथे या याबाबाबत माहिती दिली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ.दीपाली काळे, उपअधीक्षक संदीप मिटके, नगर येथील गुन्हे शाखेचे अनिल कटके, निरीक्षक संजय सानप यावेळी उपस्थित होते.

यापूर्वी गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आरोपी सागर गंगावणे व बिट्टू वायकर या दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिलेली नाही. मात्र त्यांच्या हालचाली संशयास्पद होत्या. त्यांनी शहरातील काही व्यापाऱ्यांना पैसे मागण्याचा प्रयत्न केले होता. त्यांना पैशांची गरज होती. दोघाही आरोपींविरुद्ध काही पुरावे आहेत. त्यामुळे अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींशी गंगावणे व वायकर यांचे संबंध पोलीस तपासणार आहेत, अशी माहिती मनोज पाटील यांनी दिली.

गुन्ह्यातील काही आरोपी हे सराईत आहेत. त्यांच्यावर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत. आणखी काही आरोपी निष्पन्न होतील. त्यामुळे गुन्ह्याची व्याप्ती वाढणार आहे. हिरण यांच्याकडे अपहरण झाले, त्यावेळी एक लाख ६५ हजार रुपयांची रक्कम होती. हिरण यांची हत्या मारुती व्हॅनमध्येच करण्यात आली होती. त्यानंतर मृतदेह एमआयडीसी परिसरात रेल्वेमार्गालगत आणून टाकण्यात आला, अशी माहिती पाटील यांनी दिली.

...

मदत मागण्याचा बहाणा

आपली गाडी नादुरूस्त झाल्याचा बहाणा करून हिरण यांची मदत मागितली गेली. त्यातूनच पुढे अपहरण नाट्य घडले, असे तपासात समोर आले आहे.

-----------

असा झाला गुन्ह्याचा उलगडा

अपहरण घडले त्यावेळी काही प्रत्यक्षदर्शींनी मारुती व्हॅनमधून संशयास्पदरित्या एका व्यक्तीला नेताना पाहिले होते. त्यावरून पोलिसांनी अनेक व्हॅनचा शोध घेतला. त्यावरून नाशिक येथील व्हॅन मिळून आली. ती मूळ मालकाकडून एकाने चालविण्यास घेतली होती. त्यामुळे संशय बळावल्यानंतर काही तासांमध्ये सर्व आरोपींना पकडले. या गाडीत हिरण यांच्या मोबाइलसह बँकेचे चेकबूक व पावत्या सापडल्या. त्याचबरोबर आरोपींपैकी एकाने मोठी चूक केल्याने पोलिसांना फायदा मिळाला. मात्र त्याविषयी अधिक माहिती देण्यात आली नाही.

--------------

आरोपी बेसावध झाले

हिरण यांच्या हत्याकांडात गंगावणे व वायकर या दोन आरोपींना अटक झाल्याने मूळ गुन्हेगार बेसावध राहिले. त्याचा पोलिसांना लाभ मिळाला व त्यांच्यापर्यंत पोहोचता आले. गुन्हेगारांनी दहा ते पंधरा दिवस बेलापूर येथे रेकी केल्याचे तपासात समोर आले आहे. अपहरण केल्यानंतर पसार होण्याचे मार्ग शोधण्यात आले. तसेच अपहरणासाठी मारुती व्हॅनसोबतच अन्य एक गाडी वापरण्यात आली होती. मात्र त्याबाबत तपास सुरू आहे, असे पाटील म्हणाले.

--------