यावेळी आजी-माजी सैनिकांच्या माता, भगिनी, पत्नी आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाबाबत चर्चा करण्यात आली. पुढील काळात गुंडेगाव येथे आजी-माजी सैनिकांची संघटना स्थापन करण्यात येणार आहे. अनेक कल्याणकारी योजना राबवण्यात येतील. बचत गट स्थापन करून आजी - माजी सैनिकांना आर्थिक मदत केली जाईल, असे मत मेजर सतीश हराळ यांनी व्यक्त केले.
यावेळी ज्येष्ठ समाजसेवक राजाराम भापकर गुरूजी यांच्यासमवेत चर्चा केली. बैठकीला श्रीगोंदा त्रिदल सेवा संघाचे अध्यक्ष संदीप सांगळे, कार्याध्यक्ष नितीन थोरात, नगर तालुकाध्यक्ष शरद पवार, नेवासा उपाध्यक्ष पोपट कापसे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मेजर मुरलीधर भापकर, सिध्देश्वर हराळ, विठ्ठल माने, भवानी प्रसाद चुंबळकर, राहुल चौधरी, सोपन भापकर, झुंबर भापकर, संदीप कोतकर, मोहन कुताळ, संभाजी कुताळ, सतीश हराळ, श्यामराव कासार, संभाजी भापकर, दीपक माने, रामचंद्र हराळ उपस्थित होते. संजय भापकर यांनी आभार मानले.