शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
7
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
8
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
9
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
10
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
11
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
12
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
13
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
14
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
15
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
16
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
17
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
18
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
19
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
20
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल

शस्त्रांसह टोळी गजाआड

By admin | Updated: June 9, 2016 23:39 IST

अहमदनगर : दरोडा टाकण्याच्या उद्देशाने शस्त्रांसह दबा धरून बसलेल्या सात जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गजाआड केले.

अहमदनगर : दरोडा टाकण्याच्या उद्देशाने शस्त्रांसह दबा धरून बसलेल्या सात जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गजाआड केले. या कारवाईत बुधवारी रात्री पाच जणांना अटक केली असून दोघेजण पळून गेले आहेत.विळद बायपास रोडवरील चौकाजवळ तोंडाला कपडे बांधून सातजण हातात दांडके घेवून दबा धरून बसले होते, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांना फोनवरून मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने कारवाई केली. अटक केलेल्यांमध्ये टोगऱ्या पाच्या भोसले, अक्षय उर्फ धरत्या टोगऱ्या भोसले, ताज्या पाच्या भोसले (रा. सय्यदमीर लोणी, ता. आष्टी, जि. बीड), महेश उर्फ काळ््या अर्मास काळे (रा. मोरवाडी), संदीप चाच्या भोसले (रा. सय्यदमीर लोणी, ता. आष्टी, जि. बीड) पोलिसांनी त्यांच्याकडून लाकडी दांडके, मिरची पूड, एअर गन, लोखंडी सत्तुर, दोर असे साहित्य जप्त केले. या कारवाई दरम्यान चाचा पाच्या भोसले, बोरमन उर्फ सचिन सुरेश भोसले हे दोघे पसार झाले. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दादासाहेब काकडे यांच्या फिर्यादीवरून सात जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महिला उपनिरीक्षक स्वाती देवडकर तपास करीत आहेत.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजकुमार हिंगोले, हेड कॉन्स्टेबल मधुकर शिंदे, दादासाहेब काकडे, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, विशाल अमृते, सागर सुलाने, नामदेव जाधव, बबन बेरड यांनी सापळा रचला होता. (प्रतिनिधी)