मिरजगाव : कोकणगाव व मिरजगाव येथे गुरूवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून यामध्ये चोरट्यांनी सव्वा लाखाचा ऐवज लांबवला. मिरजगाव येथील क्रांती चौकात राहणा-या हसीन सिंकदर पठाण यांच्या घरात पहाटे उघड्या खिडकीतून चोरट्यांनी प्रवेश करून घरातील दोन तोळ्याचे गंठण व पर्स मधील सहा हजार रुपये लांबवले. यासंदर्भात त्यांनी मिरजगाव चौकीत फिर्याद दाखल केली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळात उतरलेल्या दिंडीतील तीन चार महिलांच्या पिशव्याही चोरट्यांनी लांबवल्या. यामध्ये या महिलांच्या पिशवीत चार हजार, आधार कार्ड, कपडे होते तर कोकणगाव येथील दादासाहेब सुर्यवंशी यांच्या वस्तीवर पानेगाव येथील दिंडी मुक्कामी होती. यावेळी दिंडीतील महाराजांच्या तवेरा गाडीची काच फोडून 45 हजार रुपये व कपड्यांची बॅग लंपास केली.
मिरजगावमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 19:14 IST